Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनामुक्तीच्या ‘सुरगाणा पॅटर्न’ची नाशिक झेडपीने घेतली दखल; वाचा नेमकी काय वापरली उपचारपद्धती

Please wait..

नाशिक : भारत करोनामुक्त करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि अनेक संशोधक दिवसरात्र झटत आहेत. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात कोरोनामुक्तीचा ‘सुरगाणा पॅटर्न’ राबवण्यात आलेला होता. त्याची दखल आता जिल्हा परिषदेने घेतली आहे. त्यानिमित्ताने डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केलेल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नाशिक येथे आज ‘सुरगाणा पॅटर्न’ यशस्वीपणे राबविणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील वैद्यकीय क्षैत्रातील मान्यवरांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आला. कोरोनाविषयी असलेले गैरसमज व भीतीमुळे उपचारासाठी आदिवासी बांधव पुढे येत नव्हते.आदिवासी बांधवांचा ज्या उपचार पध्दतीवर विश्वास विश्वास व उपचार घेण्याची तयारी आहे,अशी आयुर्वेदीक उपचार पध्दती सुरगाण्यासारख्या आदिवासी भागात पोहचवून आदिवासी बांधवावर उपचार करण्यात आले.या माध्यमातून कोरोनामुक्तीचा ‘सुरगाणा पॅटर्न’ आदिवासी भागात प्रभावी ठरला आहे.

Advertisement

या बांधवांना कोरोनावरील उपचार, लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करणे खूप कठीण काम होते.वर्षानुवर्षे चालत असलेली आयुर्वेदीक उपचार पध्दती कोरोनाकाळात वरदान ठरली आहे.हा पॅटर्न शासनापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.लोककलेच्या माध्यमातून या बांधवामध्ये जनजागृती केल्याने अधिक प्रमाणात बांधव लसीकरण व उपचारासाठी पुढे येतांना दिसत आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply