Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाईवर केंद्र सरकारचे आहे ‘हे’ म्हणणे; पहा देशातील स्थितीवर नेमका काय केलाय दावा..!

दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात राजकारण देशासाठी काही नवीन नाही. या संकटात राजकारणी मंडळींनी प्रत्येक मुद्द्यावर राजकारण कोरोना लसींचा पुरवठा, सरकारचे लसीकरणाचे धोरण, दुसऱ्या लाटेत उडालेला हाहाकार, ऑक्सिजनची कमतरता या सगळ्याच मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकात आरोप-प्रत्यारोप होत राहिले. अजूनही सुरुच आहेत. देशात लसीकरण मोहिम सुरू आहे. या लसीकरणावर राजकीय वक्तव्ये सुरू असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन मात्र चांगलेच भडकले आहेत. लसीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या राजकारण्यांनी त्यांनी कठोर शब्दांत फटकारले आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘केंद्र सरकारने ७५ टक्के लसी मोफत पुरवठा केल्यानंतर लसीकरण वेगाने होत आहे. जून महिन्यात ११.५० कोटी लसीकरण झाले. लसीकरणाबाबत बेजबाबदार वक्तव्ये करणाऱ्यांना आता तरी शहाणे व्हावे, निदान कोरोना महामारीच्या काळात तरी राजकारण करू नये,’ अशा शब्दांत त्यांनी फटकारले. ‘तथ्य माहित असतानाही जर राजकीय नेते लसीकरणाबाबत बेजबाबदार वक्तव्ये करत असतील तर हा प्रकार दुर्दैवी आहे,’ असेही त्यांनी सांगितले. ‘जुलै महिन्यातील लसींच्या पुरवठ्याबाबत राज्यांना आधीच माहिती दिली आहे. या महिन्यात जवळपास १२ कोटी लसींचा पुरवठा राज्यांना होणार आहे. राज्यांना जर काही अडचणी असतील तर त्यांनी लसीकरण मोहिमेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली. देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply