Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आरोग्यदायी महाराष्ट्रासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार; पहा कोणते महत्वाचे पाउल टाकलेय पक्षाने

Please wait..

पुणे : सध्या करोना हा आरोग्याचा मुद्दा कमी आणि राजकीय मुद्दा जास्त झालेला आहे. आरोग्यदायी सेवा मिळत नसल्याची तक्रार केली की केंद्रात सत्ताधारी आणि महाराष्ट्रात विरोधात असलेला भाजप हा राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते व कार्यकर्ते प्रश्न करणाऱ्यांची कोंडी करतात. अशावेळी इतर पक्षही मागे नाहीत. तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने यात एक सकारात्मक पाउल उचलले आहे.

Advertisement
Loading...

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने माहिती देताना म्हटले आहे की, कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जुलै महिन्यातील दर सोमवारी विविध विषयांवर वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. डॉक्टर समीर दलवाई हे पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून फेसबुक लाइव्हद्वारे लोकांशी संवाद साधतील. समीर दलवाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत महाराष्ट्र सरकारतर्फे बालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सचे सदस्य आहेत.

Advertisement

Advertisement

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा बालकांना असलेला धोका लक्षात घेता कोरोना संक्रमण रोखण्यासाठी घ्यायची काळजी, कोरोना काळात बालकांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी व योग्य संगोपनसाठी घ्यायची काळजी, मुलांवर कोरोनाचा होणारा मानसिक परिणाम, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची मनोवस्था, सकारात्मक उपाययोजना अशा विविध विषयांवर डॉ. समीर दलवाई या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. आपणही (fb.com/NCPSpeaks) इथे सोमवार, दि. ५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत या चर्चेत सहभागी होऊ शकता, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply