Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘ती’ लस आहे खूपच प्रभावी; फ़क़्त ३० रुपयात करोना विषाणूचा खात्मा निश्चित..?

दिल्ली : अलाहाबाद हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ज्यामुळे इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च आणि भारत सरकार यांच्या इथिक्स कमेटीला कोर्टाने नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आलेला आहे की, गंगेच्या पाण्यापासून बनवलेल्या करोना लसला क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगी देण्यात यावी.

Advertisement

वरिष्ठ अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कार्यवाहक मुख्य न्यायाधीश एम. एन. भंडारी आणि न्यायमूर्ती राजेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने नोटीसचा आदेश दिला आहे. वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या न्यूरोलॉजी विभागातील प्राध्यापक डॉ. विजय नाथ मिश्रा यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या पथकाने गंगा नदीच्या पाण्यावर संशोधन करून नोझल फवारणीची लस तयार केली आहे. ज्यामुळे कोरोनामधून लोकांना दिलासा मिळू शकेल. या लसचा खर्च फ़क़्त 30 रुपये असणार आहे.

Loading...
Advertisement

याच्या क्लिनिकल चाचणीसाठी परवानगी मागितल्यावर आयसीएमआर आणि आयुष मंत्रालय यांनी कोणतीही रुची न दाखवल्याने आता याप्रकरणी कोर्टाचे दार ठोठावण्यात आलेले आहे. आतापर्यंत उपलब्ध सर्व लस व्हायरस निष्क्रिय करतात, तर गंगा नदीच्या पाण्याची प्रस्तावित लस कोरोना थेट नष्ट करेल असा दावा करण्यात आलेला आहे. लसची तपासणी पुण्यातील व्हायरलॉजी लॅबमध्ये करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. यावर पुढे काय निर्णय होतो याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply