Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

केंद्र सरकारने पाठवलेय महत्वाचे पत्र; ‘त्या’ भागातील करोना संकटाबाबत म्हटलेय ‘असे’

दिल्ली : केंद्रीय स्वास्थ्य सचिव राजेश भूषण यांनी राजस्थान, त्रिपुरा, आसाम, केरळ, पश्चिम बंगाल, मणिपूर, सिक्कीम, पाँडेचेरी, ओडिशा, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश या राज्यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे, की ज्या जिल्ह्यांत २१ ते २७ जून दरम्यान कोरोना संक्रमणाचा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त होता. त्या जिल्ह्यात भविष्यातील धोका पाहता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Advertisement

कोरोना अजून गेलेला नाही सध्या फक्त त्याचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे निष्काळजीपणा संकटात टाकू शकतो. राज्यांनाही केंद्राने अशाच पद्धतीने अलर्ट केले आहे. आता तर आरोग्य विभागाने काही राज्यांना पत्र पाठवत वेळप्रसंगी पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यासही सांगितले आहे. एकीकडे राज्ये लॉकडाऊनचे निर्बंध कमी करत आहेत, तर दुसरीकडे आरोग्य विभागाने कठोर निर्बंधांबाबत सांगितले आहे. यामागे नेमके काय कारण आहे, याचा खुलासा आरोग्य विभागाने या पत्रात केला आहे.

Advertisement

सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी निगरानी ठेवणे गरजेचे आहे. जिल्हा आणि तहसील पातळीवर निगरानीचे कामकाज वाढवणे आवश्यक आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने निर्बंध कमी केले जात आहेत. मात्र, याबाबत विचार करुन निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचे संक्रमण पाहता जर जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला तर निर्बंध १४ दिवस कायम ठेवले पाहिजेत. जिल्ह्यातील जी ठिकाणे कंटेन्मेंट झोनमध्ये येत नाहीत तेथे निर्बंधात सवलती दिल्या जाऊ शकतात.

Loading...
Advertisement

देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली. देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply