Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोप्पंय की.. फ़क़्त ‘त्या’ भाज्या अन चहा पिऊन वजन करा कमी..!

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. तसेच फास्ट फूडचे प्रमाण वाढत चालल्याने लठ्ठपणाच्या समस्या निर्माण होत आहेत. शरीराचे वजन वाढले की त्यानंतर अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळेवजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. अनेकदा हेवी वर्कआऊट्स आणि डाएटिंग करण्यावर भर दिला जातो. परंतु, यामुळे वजन कमी होईलच याची शाश्वती देता येत नाही. काही उपाय केल्यास आपण आपले वजन नियंत्रित करू शकतो. त्यासाठी फार खर्च सुद्धा करावा लागत नाही. काही घरगुती उपायांचा वापर करुन देखील आपण वजन नियंत्रित करू शकतो. चला तर मग काय आहेत हे उपाय ते जाणून घेऊ…

Advertisement

सर्वात महत्वाचे म्हणजे आपण योग्य आहार घेऊन देखील वजन कमी करू शकतो. हर्बल टी घेऊ शकता. यामुळे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. दररोज ‘हर्बल टी’चे नियमित घेतल्यास वजनही कमी होते. बर्‍याच संशोधनांमध्ये असे आढळले आहे की, हर्बल टी घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हर्बल टी टीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. दररोज हर्बल टी घेतल्यास शरीरातील साखर नियंत्रणात राहते. आज फास्ट फूड खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे मात्र आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. वजन वाढण्यासही हा घटक कारणीभूत आहे. त्यामुळे अतिप्रमाणात फास्ट फूड खाणे टाळले पाहिजे.

Advertisement

Loading...
Advertisement

कोबीमध्ये व्हिटामिन ‘सी’, ‘के’ आणि ‘ए’ जास्त प्रमाणात असतात. कोबी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बरेच पौष्टिक पदार्थ आहेत. हे सॅलडमध्ये खाल्ल्याने शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात. तसेच पाचनशक्ती मजबूत होते. याशिवाय दररोज कोबी खाण्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. आपल्या रोजच्या आहारात भोपळा, काकडी यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटामिन ‘ए’ असते. त्यामुळे या भाज्या पाचक शक्ती वाढवतात. शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते. तसेच वजन कमी होण्यास देखील मदत होते. या पद्धतीने नियमितपणे आहार घेतल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत मिळेल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply