Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सावधान.. बोगस लसीकरण अभियानाचे बळी पडू नका; हजारोंना बसलाय फटका..!

मुंबई : एकीकडे देशभरात करोना लसटंचाई जोमात आहे. त्याचवेळी याचा गैरफायदा घेऊन आपले उखळ पांढरे करणारे जोशात आहेत. त्यामुळेच हॉटेल, मंगल कार्यालये किंवा गृहनिर्माण सोसायटी यामध्ये बोगस लसीकरण अभियान राबवले जात आहेत. लसटंचाईमुळे भीतीपोटी नागरिक या पद्धतीला बळी पडून आपले आरोग्य आणखी धोक्यात आणत आहेत.

Advertisement

Advertisement

महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मुंबई हायकोर्टात दिलेल्या माहितीमुळे स्पष्ट झालेले आहे की, सध्या बोगस लसीकरण जोमात आहे. सरकारकडून लस वेळेत न मिळाल्याने हा नवा गोरखधंदा फोफावला आहे. बोगस लसीकरण पीडितांवरच्या साइड इफेक्ट्सची तपासणी करतानाच ज्यांनी ही लस घेतली त्यांना नेमके काय टोचण्यात आले होते आणि बनावट लसीचा परिणाम काय होऊ शकतो याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

Loading...
Advertisement

राज्य सरकारचे वकील दीपक ठाकरे यांनी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता व न्या. जी.एस. कुलकर्णी यांच्या पीठासमोर स्थिती अहवाल सादर करताना म्हटले की, मुंबईत बोगस लसीकरण शिबिरांत २,०५३ पेक्षा जास्त लोकांना लस टोचण्यात आली आहे. असे ९ कॅम्प आयोजित झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहेत. राज्य सरकार खासगी गृहनिर्माण संस्था, सोसायट्यांत लसीकरण शिबीरांबाबत दिशानिर्देश ठरवू न शकल्याबद्दल कोर्टाने आक्षेप घेऊन सुनावले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply