पुणे : देशभरात सध्या करोना लसीकरण हा मुद्दा टंचाईमध्ये अडकला आहे. अनेकांना लसीकरण मिळण्यासाठी हेलपाटे मारावे लागल्याने लसीकरण करून घेण्याचा नाद सोडवा लागला आहे. लसीकरण न झाल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की भारतावर ओढवली आहे. मात्र, तरीही उत्सवी भारत देशात आणि सरकारी यंत्रणेत अनास्था कायम आहे. अशावेळी यूनिव्हर्सिटी ग्रांट्स कमीशन (UGC) यांनी सर्व विद्यापीठ, कॉलेज आणि टेक्निकल इंस्टीट्यूट्सना मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देणारे बॅनर लावण्याचे आदेश देऊन टाकले आहेत.
विद्यार्थ्यांना लसीकरण केले जात नसल्याचे वास्तव असताना असा अजब फतवा निघाल्याने देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दिव्य मराठी यांच्या बातमीत म्हटले आहे की, एका व्हॉट्सअॅप मेजेसमध्ये UGC सेक्रेटरी रजनीश जैन यांनी शैक्षणिक संस्थांच्या सोशल मीडिया पेजवर धन्यवादचे बॅनर शेअर करण्यास सांगितले आहे. कथित मेसेजमध्ये म्हटले आहे की, भारत सरकार 21 जून, 2021 पासून 18 + वयोगटाचे मोफल लसीकरण सुरू करत आहे. याबाबत विद्यापीठ आणि कॉलेजने आपल्या सोशल मीडियावर बॅनर शेअर करावे.
मेसेजसमवेत बॅनर शेअर करण्यासाठीचा नमुनाही देण्यात आलेला आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून उपलब्ध केलेले होर्डिंग्स आणि बॅनरचे डिझाइन हिंदी आणि इंग्रजीमध्ये रेफरेंससाठी समवेत दिलेले आहेत. पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असून वर थँक यू PM मोदी लिहीले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 याच महिन्यात 18+ वयोगटासाठी मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. सोमवारी याची सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर हे ThankyouModiji अभियान राबवले जात आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.