आजच्या धावपळीच्या जमान्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. फास्ट फूडचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. तसेच लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. जीवनात व्यायामाला महत्व आहे. मात्र, आजच्या काळात या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सुद्धा आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
वाढत्या वजनाची समस्या अनेकांना भेडसावत आहे. त्यामुळे कोणत्या मार्गांनी ही समस्या कमी होईल हे शोधण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. काही जण तर फक्त वजन कमी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात. मात्र, काही सोप्या पद्धतींनी आपण वाढलेले वजन कमी करू शकतो. यासाठी फार खर्च करण्याची सुद्धा आजिबात गरज नाही.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय केले तरी उपयोग होईल. वजन कमी करायचे असेल तर शक्यतो एक ग्लास पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. त्यानंतर नाश्ता करा. दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिल्यास फायदा होईल.
वजन कमी करण्यासाठी सकाळी भोपाळ्याचा ज्यूस, कोरपड, व्हीटग्रास ज्यूस घेऊ शकता. |
जास्त तेलकट पदार्थ खाणे कमी करा, साखर युक्त पदार्थ सुद्धा कमी केले पाहिजेत. कारण यामुळे जास्त वजन वाढते. |
फळे व हिरव्या पालेभाज्या आहारात असणे महत्वाचे आहे. |
आल्याचा चहा किंवा ग्रीन टी घेण्याची सवय लावा, कारण ग्रीन टी मुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. |
आहारात कडधान्यांचा समावेश करा. यामध्ये आधिक फायबर असते. यामुळे लवकर भूक लागत नाही. |
सर्वात महत्वाचे म्हणजे वजन कमी करण्यासाठी चालणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करा. |
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.