Take a fresh look at your lifestyle.

ब्लॉग : मोफत लस अन् मोदींसह मुख्यमंत्र्यांची हुकलेली ‘ती’ संधी..!

माननीय पंतप्रधानांनी देशाला उद्देशून भाषण करताना करोनाविरुद्ध काम करणारी लस देशातील नागरिकांना मोफत दिली जाईल असे जाहीर केले.

Advertisement

खरे तर, लोकशाहीमध्ये जनताच मालक असल्याने मालकाला नोकरांनी काही मोफत द्यावे, हाच एक विनोद आहे. यानिमित्ताने जनतेला ती मालक असल्याचे सांगण्याची एक मोठी संधी देशाच्या नेतृत्वाने गमावली आहे. जनता विविध करांच्या रूपाने जो निधी ग्रामपंचायतपासून राज्याच्या तिजोरी मार्गे देशाच्या खजिन्यात टाकते, तोच निधी विविध योजना अन् नावे घेवून परत जनतेकडे येत असतो. परंतु मधले दलाल मात्र तो निधी जणू काही यांच्या वैयक्तिक बापाच्या मालकीचा असल्याच्या थाटात “अमक्याच्या अथक प्रयत्नातून” अन् “तमाक्याच्या आमदार खासदार निधीतून” अशी फुकटची जाहिरात करत फिरत असतात.

Advertisement

लेखक : डॉ. भारत करडक (नेवासा, अहमदनगर)

Advertisement

बेवारस कार्यकर्ते यात आघाडीवर असतात कारण त्याच फुकटच्या पैश्यातील रस्सा, मटण अन् दारू यांना पाहिजे असते, मिळणार असते. जनतेच्या निधीतून सेवकांची जाहिरात करायला कोर्टाने बंदी घातलेली असूनही सार्वजनिक कामाच्या ठिकाणी या लोकांची नावे असणाऱ्या पाट्या लावायला आजही लाखो रुपये खर्च होताना दिसतात. आयजीच्या जीवावर बायजी उधार, असेच चित्र दिसते. करोना काळात लोकांच्या स्वच्छतेच्या सवयी बदलू लागल्या आहेत. दहा टक्के लोक जरी स्वच्छ राहायला लागली तर आपण जिंकलो अशी परिस्थिती आहे. औषधांची नावे, ते काम कसे करते, त्याचे साईड इफेक्ट काय अश्या प्रश्नांवर मूलभूत चर्चा होताना दिसत आहे. अगदी विज्ञानाचे मूलभूत सिद्धांत लोक समजून घेत आहेत. आरोग्यासाठी काय चांगले काय वाईट यातून अन्न, पाणी, हवा याबद्दल जागरूकता वाढत आहे.

Advertisement

अश्या वेळी, हा देश जनतेचा आहे. देशाची तिजोरी जनतेची आहे, अन् जनताच मालक आहे. बाकी सर्व व्यवस्था पाहणारे जनतेचे सेवक आहेत, नोकर आहेत, हे सांगण्याची संधी सर्वच राज्यप्रमुख अन् देशांच्या प्रमुखांनी घालवली आहे. राज्याची अन् देशाची जबाबदारी जनतेवर टाकून केवळ तिजोरीच्या चावीसाठी भांडण सुरू आहे, हे जनतेला कळायला लागले आहे. जनता झोपेत आहे. तिला उठवू नका. हेच सर्वांचे ब्रीदवाक्य ठरते आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply