Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारची मोठी घोषणा; पहा कसा फायदा होणार प्रत्येकाचाच

दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. अनेक ठिकाणी लसींची कमतरता जाणवत आहे. लसीकरण केंद्रांना टाळे लागले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने लसीकरणाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोफत करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. याआधी केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांना दिली होती. आता मात्र, यामध्ये बदल करत १८ वर्षांपुढील सर्वच नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. २१ जून पासून मोफत लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात काही महत्वाचे मुद्दे मांडले :

Loading...
Advertisement
  • लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून ७५ टक्के लस खरेदी करुन राज्यांना मोफत उपलब्ध करुन देणार आहोत.
  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेस मुदतवाढ दिली असून आता नागरिकांना या योजनेंतर्गत दिवाळीपर्यंत मोफत धान्य देण्याचे नियोजन केले आहे.
  • या योजनेंतर्गत देशातील ८० कोटी नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार आहे.
  • केंद्र सरकारने केलेल्या नियोजनामुळे काही दिवसात पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध होतील, लसींची कमतरता जाणवणार नाही. आज देशात जवळपास ७ कंपन्या लस निर्मिती करत आहेत. आणखी तीन लसींच्या ट्रायल सुरू आहेत. देशात आतापर्यंत २३ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले आहे.
  • मिशन इंद्रधनुष्यच्या माध्यमातून देशात जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्यात आला. सन २०१४ मध्ये ज्यावेळी सत्तेत आलो तेव्हा देशातील एकूण लसीकरणाचे प्रमाण फक्त ६० टक्केच होते.
  • एप्रिल महिन्यात देशभरात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही ऑक्सिजनला मागणी नव्हती. देशातील ऑक्सिजनचे संकट पाहता ऑक्सिजनच्या निर्मितीवर भर देण्यात आला. त्यामुळे कमी वेळात ऑक्सिजन निर्मितीत दहा पटींपेक्षा जास्त वाढ करण्यात यश मिळाले

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply