Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : पीएम केअर व्हेंटिलेटर्सची नवखी कंपनीच बनली मॉडर्न; सरकार कंपनीच्या बाजूने; पहा नेमका काय केलाय दावा

औरंगाबाद : पीएम केअर फंडातून दिलेली ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स आपली नसून वेगळीच असल्याचा दावा करताना मॉर्डन’ व्हेंटिलेटर्स वापरण्याचे ‘प्रशिक्षण’ असलेले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी औरंगाबादमध्ये नसल्याचा युक्तिवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या प्रशासनाने केला आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्यावतीने औरंगाबाद खंडपीठापुढे सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीत केंद्र सरकारकडून असा दावा करण्यात आल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. प्रशिक्षित डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी औरंगाबादमध्ये नसल्याचा युक्तिवाद करत केंद्र सरकारने कंपनीची पाठराखण करतानाच व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून पुरवलेली नाहीतच असेही म्हटले आहे. मग हे व्हेंटिलेटर्स नेमके कोणाचे असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

एप्रिल महिन्यात पीएम केअरमधून औरंगाबादमध्ये १५० व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आली होती. त्यातील ११३ निकामी झाल्याने वापरता आली नसल्याचे तसेच पुरवठादार कंपनी ज्योती सीएमसीतर्फे त्याच्या दुरुस्तीबाबत प्रतिसाद मिळाला नसल्याचे हे प्रकरण आहे. व्हेंटिलेटर्स कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कुचकामी ठरत असल्याने दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणीत केंद्र सरकारने असे म्हटल्याने आता कारवाई कोणावर होणार, हाच कळीचा मुद्दा बनला आहे.

Loading...
Advertisement

सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी केंद्र सरकारची बाजू मांडताना म्हटले की, व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून पुरवण्यात आली नाहीत. औरंगाबादमधील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच ती व्हेंटिलेटर्स ऑपरेट करता आली नाहीत. ज्योती सीएनसी कंपनीचे म्हणणे त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यात त्यांनी व्हेंटिलेटर्स निर्मितीतील अनुभव नसतानाही सध्याच्या परिस्थितीचा विचार करून उत्पादन सुरू केल्याचे म्हटले आहे. तर, केंद्राने या कंपनीच्या यंत्रांना थेट मॉडर्न करून टाकले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply