Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अनलॉकबाबत जयंत पाटलांनी व्यक्त केलेय मत; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

पुणे : राज्यात करोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी लॉकडाउन लगेचच मागे घेतला जाणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. टप्प्याटप्प्याने निर्बंधात सवलत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. राज्य सरकारचे मंत्री सुद्धा तसेच सांगत आहेत. त्यानंतर आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लॉकडाऊनबाबत मत व्यक्त केले आहे.

Advertisement

राज्यात आज करोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे. मात्र, पॉझिटिव्हिटी रेट पूर्णपणे कमी होत नाही, तोपर्यंत धोका टळला असे म्हणता येणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनबाबत दोन दिवस परिस्थिती पाहून मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे मंत्री पाटील म्हणाले. राज्यात अजूनही काही जिल्ह्यात करोना आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करुन निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकार आधिवेशन का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित करत सरकारने आधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान विरोधकांकडून दिले जात आहे. या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, की सरकार आधिवेशन का घेत नाही, याचे कारण सर्वांनाच माहित आहे. करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकार सुद्धा आधिवेशन घेत नाही. केंद्राचा नियम हा प्रत्येक राज्यालाही लागू होतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत राज्यातही आधिवेशन होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

दरम्यान, लॉकडाऊनबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मात्र लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय झाला आहे. मात्र, यावेळी काही सवलतीही देण्यात येणार आहेत. याबाबत लवकरच नियम प्रसिद्ध करण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्यावरुन असेच दिसून येत आहे, की लॉकडाऊन वाढवला जाणार असला तरी काही सवलतीही मिळणार आहेत. लॉकडाऊनबाबत मात्र राज्यातील परिस्थिती पाहून मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अजूनही लॉकडाऊनबाबत संभ्रम कायम आहे. दुसरीकडे देशातील अन्य राज्यांनी मात्र सवलती देण्यास सुरुवात केली आहे. राज्यात करोनाचे रुग्ण कमी होत असल्याने १ जूननंतर निर्बंध मागे घ्यावेत, अशी मागणी राज्यातील व्यापाऱ्यांनी केल आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप काहीच स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे लॉकडाऊनबाबत राज्य सरकारचे पुढील नियोजन काय आहे, राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply