Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाईच्या मुद्द्यावर भाजपने दिलेय विरोधकांना ‘हे’ प्रत्युत्तर; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई : करोना संकटात देशात राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात सातत्याने वाद होत आहेत. केंद्र सरकार राज्यांना मदत करण्याऐवजी त्यांना आधिकच त्रास कसा होईल, याचाच विचार करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या राज्य सरकारे केंद्रावर अशाच पद्धतीने टीका करत आहे. महाराष्ट्र राज्यासह अनेकांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. त्यावर भाजपने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

भाजपा महाराष्ट्र on Twitter: “केंद्र सरकार लस खरेदीसाठी पुरेसे प्रयत्न करत नाही असा अपप्रचार विरोधकांकडून केला जातोय. परंतु त्यात काही तथ्य नसून केंद्र सरकार 2020 पासूनच सर्व प्रमुख उत्पादकांसोबत संपर्कात आहे. @narendramodi @drharshvardhan https://t.co/UUyLgNdV4a” / Twitter

Advertisement

केंद्र सरकारच्या ठरलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार पारदर्शक पद्धतीने सर्व राज्यांना लसींचा पुरवठा होतो. केंद्र सरकार लस खरेदीसाठी पुरेसे प्रयत्न करत नाही असा अपप्रचार विरोधकांकडून केला जातोय. परंतु त्यात काही तथ्य नसून केंद्र सरकार 2020 पासूनच सर्व प्रमुख उत्पादकांसोबत संपर्कात आहे, असा दावा आणि माहिती महाराष्ट्र भाजपने दिली आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, लहान मुलांच्या लसीकरणासाठी मोदी सरकार कोणतीही पावलं उचलत नाही या अपप्रचाराला कोणीही बळी न पडता, त्यामागचे खरे सत्य जाणून घ्यावे.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात सध्या असाच वाद केंद्र आणि राज्यांत सुरू आहे. लसी मिळत नाही, त्यामुळे लसीकरण रखडले. ऑक्सिजन मिळत नाही. केंद्र सरकार मदत करत नाही, संकटाच्या काळात राजकारण होत आहे, ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, त्या राज्यांना जास्त त्रास होत आहे, अशा तक्रारी आहेत. मात्र, केंद्र सरकार याची दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे या समस्या आजही कायम आहेत. दोन्ही सरकारात समन्वय दिसत नाही. त्यामुळे देशात लसीकरण अत्यंत संथ गतीने होत आहे. करोना अजूनही नियंत्रणात आलेला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply