Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाईवर मोदी सरकारचा ‘हा’ उतारा; पहा नेमके काय ‘नियोजन’ केले जात आहे ते

दिल्ली : लसीकरणाच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात रोजच वाद होत आहेत. लसी मिळत नसल्याने लसीकरणात अडचणी येत असल्याची राज्यांची तक्रार आहे. तर राज्यांकडे अजूनही काही लसी शिल्लक आहेत, असा दावा केंद्र सरकार करत आहे. हा वाद सुरू असतानाच आता करोना प्रतिबंधक लसींबाबत महत्वाची बातमी आली आहे. देशातील लस टंचाई दूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असून लवकरच आणखी चार करोना प्रतिबंधक लसी मिळणार आहेत.

Advertisement

दुसरीकडे देशात लसींचे उत्पादन वाढवण्याचे नियोजन केले जात आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत देशात तब्बल २०० कोटी लस तयार झालेल्या असतील, असे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. या व्यतिरिक्त फायजर आणि मॉडर्ना या लस उत्पादक कंपन्यांबरोबर केंद्र सरकार चर्चा करत आहे. फायजरने तर यावर्षीच पाच कोटी लस देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, कंपनीने काही अटी ठेवल्या आहेत. केंद्र सरकारने या अटी मान्य करणार असल्याचे म्हटले आहे, असे समजते. रशियाच्या स्पुतनिक लसीचेही उत्पादन लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Advertisement

भारत बायोटेक कंपनी सुद्धा लसींचे उत्पादन वाढवण्याचे नियोजन करत आहे. अशा पद्धतीने देशातील लसींची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने लसींचे असे नियोजन केले आहे. या प्रमाणेच जर कार्यवाही झाली तर आगामी काळात देशास मोठ्या संख्येने लसी उपलब्ध होतील. देशात सध्या लसींची टंचाई आहे. लसी मिळत नसल्याने राज्यांना लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. या अडचणी दूर केल्या नाही तर देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यास मोठा कालावधी लागणार आहे. करोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने मात्र हे परवडणारे नाही. त्यामुळे नियोजन करुन लवकरात लवकर राज्यांना लसी देणे महत्वाचे आहे.

Loading...
Advertisement

देशात करोनाची दुसरी लाट आता कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असे असले तरी धोका अजूनही कायम आहे. कारण, देशात दररोज दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. काही राज्यात रुग्णसंख्या वाढण्याचा वेग जास्त आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तिसरी लाट केव्हा येईल, याबाबत आज काही सांगता येत नाही. तरी देखील राज्यांनी आता पासूनच नियोजन सुरू केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply