Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट’ सोशल मीडियावर शेअर करू नका, असा बसू शकतो फटका.!

मुंबई : कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे लसीकरण मोहिमेलाही वेग आला आहे. सध्या 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. लस घेतल्यावर सरकारतर्फे नागरिकांना ‘व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट’ दिले जात आहे. काही जण हे प्रमाणपत्र सोशल मीडियावरून शेअर करतात. मात्र, तसे केल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता असून, कोणीही हे सर्टिफिकेट शेअर करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.

Advertisement

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने सेफ्टी आणि सायबर सिक्योरिटी जागरूकतेबाबत लोकांना माहिती देण्यासाठी ‘सायबर दोस्त’ (Cyber Dost) हे ट्विटर हॅण्डल तयार केले आहे. त्यावरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये लोकांना ‘कोविड-19 व्हॅक्सीन सर्टिफिकेट’ ऑनलाइन शेअर न करण्याचा इशारा दिला आहे. ‘व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट’वर तुमचे नाव, वय आणि लिंग, तसेच पुढील डोसची तारीख, अशी माहिती असते.

Advertisement

ट्विटमध्ये असे म्हटलंय, की सर्टिफिकेटवरील या माहितीच्या आधारे तुमची बनावट कागदपत्रे तयार केली जाऊ शकतात. त्यातून फसवणुकीचे प्रकार होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कोणीही हे सर्टिफिकेट शेअर करू नये, असे आवाहन केले आहे.

Loading...
Advertisement

सर्टिफिकेट भविष्यासाठी उपयुक्त
नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यावर सरकार एक ‘प्रोव्हिजनल सर्टिफिकेट’ जारी करते. त्यात खासगी माहितीसह दुसऱ्या डोसची तारीख असते. दुसरा डोस घेतल्यानंतर ‘फायनल सर्टिफिकेट’ दिले जाते. हे ‘व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट’ भविष्यात ‘इंटरनॅशनल ट्रॅव्हल’सह अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरू शकते. आरोग्य आरोग्य सेतू अॅप, अथवा CoWin पोर्टलवरूनही हे सर्टिफिकेट डाउनलोड करता येते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply