Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून झालाय लसमोजणीत घोळ; पहा केंद्राला काय उत्तर दिलेय ‘त्या’ राज्याने

दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेला वाद लवकर मिटेल असे वाटत नाही. कारण, आता एका नव्याच मुद्द्यावरुन वाद सुरू झाला आहे. तसे ते अपेक्षितही होतेच. केंद्र सरकारने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार करोना प्रतिबंधक लसी वाया घालवणाऱ्या राज्यांच्या यादीत झारखंड, छत्तीसगड आणि तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत.

Advertisement

छत्तीसगड सरकारने मात्र केंद्र सरकारच्या या यादीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. छत्तीसगड राज्याचे आरोग्यमंत्री टीएस सिंह देव यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की केंद्र सरकारने एक नवीन पोर्टल तयार केले आहे. केंद्र सरकार राज्य सरकारकडून माहिती न घेता थेट लसीकरण केंद्रांवरुन माहिती घेत आहे. काही लसीकरण केंद्रांकडून माहिती मिळण्यास वेळ लागत आहे. मात्र, लसींची माहिती न मिळाल्याने केंद्र सरकार यास लसी वाया घालवल्याचे सांगत आहे. लसींबाबत योग्य माहिती घेण्याआधीच केंद्र सरकार त्यास लसींची नासधूस केल्याचे म्हणत आहे.

Advertisement

केंद्र सरकारला जर आमच्यावर विश्वासच नसेल तर याची चौकशी करण्यासाठी एखादे पथक राज्यात पाठवू शकता. मुळात केंद्र सरकारचे मनसुबे चांगले नाहीत, आणि केंद्र सरकारकडून जी वक्तव्ये केली जात आहेत, त्यातही राजकारण आहे, अशी टीका आरोग्यमंत्री देव यांनी केली. केंद्र सरकारने लसी वाया घालवणाऱ्या राज्यांची माहिती दिली आहे. छत्तीसगड राज्याने ३०.२ टक्के लसी वाया घालवल्या आहेत,असे केंद्र सरकारने सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून काही राज्यांनी यावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, अजूनही अशी काही राज्ये आहेत, ज्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लसी वाया घालवल्या जात आहेत.

Loading...
Advertisement

देशात लसींची टंचाई आहे. तर, दुसरीकडे राज्ये लस वाया घालवत असल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. प्रत्यक्षात मात्र यामागे काय कारण आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. राज्य सरकारांकडून माहिती न घेता थेट लसीकरण केंद्रांकडून माहिती घेण्यात येत आहे. याचे काय कारण आहे, असा सवाल राज्य सरकारांकडून केला जात आहे. मात्र, केंद्र सरकार याचे उत्तर देत नाही. त्यामुळे या मुद्द्यावरही आता केंद्र आणि राज्य सरकारांत वाद होत आहेत. केंद्र सरकार आधीच सांगत आहे, की राज्यांकडे दोन कोटींपेक्षा जास्त लसी शिल्लक आहेत. राज्यांनी मात्र यास नकार दिला आहे. पुरेशा लसी मिळत नसल्याची राज्यांची तक्रार आजही कायम आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply