Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘तिथे’ होणार करोनामृत्यूचेही ऑडीट; पहा मुख्यमंत्र्यांनी नेमके काय आदेश दिलेत..!

दिल्ली : देशातील राजकारणी मंडळी कोणत्या मुद्द्यावर राजकारण करतील काहीच सांगता येत नाही. राजस्थान राज्यात करोना वेगाने वाढत आहे. या आजाराने अनेक जणांचे मृत्यू झाले आहेत. या मुद्द्यावर विरोधक राज्य सरकारवर आरोप करत आहे. सत्ताधारीही या आरोपांना उत्तर देत आहेत. आता मात्र या सततच्या आरोपांना वैतागलेल्या राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. करोना महामारीच्या काळात राज्यात झालेल्या सर्व मृत्यूंचे ऑडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. करोनामुळे आणि अन्य कारणांमुळे किती मृत्यू झाले आहेत, याची माहिती गोळा केली जाणार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आदेश दिले आहेत.

Advertisement

करोना काळात होणाऱ्या मृत्यूंच्या मुद्द्यावर विरोधक राज्य सरकारवर आरोप करत आहेत. याचे कारणही आहे. या काळातील मृत्यूचे सरकारी आकडे आणि अन्य आकडेवारीत फरक आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. घरीच उपचार घेणाऱ्या ज्या करोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला, त्याची माहिती सरकारकडे नसल्याचा आरोप होत आहे. तसेही राज्य सरकार सोशल सिक्युरिटी पॉलिसी योजना सुरू करणार आहे. या योजनेंतर्गत घरातील कमावणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू  झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दर महिन्यास काही पैसे आणि धान्य देण्यात येणार आहे. यासाठी सरकारला राज्यात सर्वे करायचाच होता. त्यास आता ऑडीटचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता या योजनेसाठी सर्वे करण्याबरोबरच करोना काळात झालेल्या मृत्यूच्या कारणांचाही शोध घेण्यात येणार आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, राजस्थानलाही करोनाचा फटका बसला आहे. राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. या आजारास नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. दुसरीकडे राज्यात लसीकरण मोहिमही सुरू आहे. येथेही लसीकरणात अडचणी येत आहेत. राज्यानेही लसींसाठी ग्लोबल टेंडर प्रसिद्ध केले होते. मात्र, लस उत्पादक कंपन्यांनी यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरी लाट ओसरत असली तरी धोका टळलेला नाही. आता तर तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. भविष्यातील धोका ओळखून नियोजन करण्यात येत आहे. राज्यात लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी पुरेशा प्रमाणात लसी मिळाल्या पाहिजेत, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. या मुद्द्यावर मुख्यमंत्री गेहलोत यांनी कालच मोदी सरकारला इशारा दिला होता. राज्यांना पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी केली होती.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply