Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाईमुळे केजरीवालही पुन्हा भडकले; पहा केंद्र सरकारवर काय केलीय टीका

दिल्ली : करोनास आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणच प्रभावी आहे. त्यामुळे जगातील देशांनी सुज्ञपणा दाखवत पटापट लस खरेदी केल्या, जितकी तत्परता दाखवत लस खरेदी केल्या तितकीच तत्परता दाखवत नागरिकांचे लसीकरणही केले. याचा परिणाम असा झाला की आज या देशात करोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे निर्बंधही कमी केले जात आहेत. भारतात मात्र लसीकरणावरुन वेगळेच राजकारण सुरू झाले आहे. देशात लसींची कमतरता असल्याने लसीकरणाने अजूनही वेग घेतलेला नाही. राज्यांना लस मिळत नाहीत, तर केंद्र सरकार मात्र राज्यांकडे लसी असल्याचा दावा करत आहे. सरकारकडून लस खरेदीही होत नसल्याने राज्ये केंद्राच्या कारभारावर टीका करत आहेत.

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोपही केले आहेत. त्यांनी सांगितले, की दिल्लीत लसीच शिल्लक नाहीत. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केंद्रे चार दिवसांपासून बंद आहेत. तसे पाहिले तर आज आपणास लसीकरणासाठी नवीन केंद्र सुरू करण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र, आहे तीच केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. युवकांच्या लसीकरणासाठी सुद्धा लस शिल्लक नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी लस नाही. केंद्र सरकारकडे लसींची मागणी केली आहे. मात्र, अजूनही लसी मिळालेल्या नाहीत. देशात महामारीच्या काळात अनेक लसीकरण केंद्रे बंद आहेत. करोना प्रतिबंधक लसींची प्रचंड टंचाई आहे. जर देशातील नागरिकांचे मार्च महिन्यापर्यंत लसीकरण केले असते तर दुसऱ्या लाटेचा प्रकोप निश्चितच कमी करता आला असता.

Loading...
Advertisement

देशातील कोणत्याही राज्यास लस खरेदी करता आलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, लस कंपन्यांनी राज्यांना लस देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. लस उपलब्ध करुन देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकारांची नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. देशात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, पाकिस्तानने देशावर हमला केला तर त्यावेळीही केंद्र सरकार राज्यांवर जबाबदारी ढकलणार का, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. एकूणच देशात आता लसीकरणाचीही परिस्थिती गंभीर होत आहे. लसीकरण अ्त्यंत धिम्या गतीने होत आहे. देशाच्या अफाट लोकसंख्येचा विचार केला तर लसीकरण खूप वेगाने होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नाही. याच गतीने लसीकरण होत राहिले तर देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यास काही वर्षे लागतील. करोनाचे वाढते संकट पाहता लसीकरणासाठी इतका वेळ देणे निश्चितच परवडणारे नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply