Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गंगा किनाऱ्यावरील चित्र आताचे नाही तर 3 वर्षांपूर्वीचे; ही आहे परंपरा, मुख्यमंत्री योगी यांचाच दावा..!

दिल्ली : करोना कालावधीत उत्तरप्रदेश या रामराज्यातील आकडेवारी कमी दाखवली जात असून वास्तव गंगा नदीच्या किनाऱ्यावर असल्याच्या शेकडो बातम्या आलेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. मात्र, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दाखवलेल्या बातम्या या वास्तव नसून दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी यांच्याच कार्यालयाने केला आहे.

Advertisement

त्यांनी याबाबत ट्विटरवर एक बातमीची इमेज शेअर केली आहे. त्या बातमीत म्हटलेले आहे की, गंगा किनाऱ्यावरील हे फोटो 18 मार्च 1918 चे आहेत. दैनिक जागरण नावाच्या राष्ट्रीय वृत्तपत्रात ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये म्हटलेले आहे की, संगमनगरी येथील भागात सध्याचा फोटो म्हणून शेअर करून अनेकांनी करोना कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेले असून वाळूमध्ये त्या मृतांवर अंत्यसंस्कार केले असल्याचे म्हटलेले आहे. वास्तवात यातील काही फोटो हे जुनेच फोटो आहेत. तसेच या भागात मृतांवर अग्नीसंस्कार न करता त्यांना जमिनीत पुरण्याची परंपरा आहे. 2018 मध्ये कोणतीही आपत्ती नसताना ज्या पद्धतीने वाळूत मृत शरीर दिसतात, अगदी सध्याही त्याच पद्धतीचे चित्र आहे.

Advertisement

Yogi Adityanath Office on Twitter: “कोरोना नहीं था, फिर भी तीन साल पहले ऐसी ही थी गंगा किनारे की तस्वीर https://t.co/ld5ZtHGmEv” / Twitter

Advertisement

एकूणच जुने फोटो किंवा तिथे असलेली स्थानिक परंपरा यामुळे आताही या भागात मृतांवर जमिनीत पुरण्याचे संस्कार केले जात असल्याने असे आभासी चित्र निर्माण झालेले आहे. प्रयागराज येथील जिल्हाधिकारी यांनीही अशीच परंपरा असून त्यामुळेच असे फोटो व्हायरल झाल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. त्यांनी सर्वांना आवाहन केले आहे की, अशी परंपरा न जपता अग्नीसंस्कार करण्याची कार्यवाही करून नागरिकांनी सहकार्य करावे. एकूणच येथील परंपरा आणि वास्तव यांचा मेळ बसवून वार्तांकन करणे आवश्यक आहे. मात्र, यातील नेमके वास्तव कोणते असाच प्रश्न मग इतर भागातील जनतेला पडणे साहजिकच आहे.

Loading...
Advertisement

घाटावर उपस्थित पंडित म्हणतात की शैव पंथीय लोक गंगेच्या काठी मृतदेह पुरत आहेत. ही खूप जुनी परंपरा आहे. हे थांबवता येत नाही. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील. राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी यावर्षी 5 मार्चला श्रृंगवेरपुरला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी येथे पूजाही केली. त्यांच्या भेटीपूर्वीच जिल्हा प्रशासनाने घाटावर मृतदेह दफन करण्यासाठी सीमा निश्चित करण्यासाठी एसडीएम व प्रांतीय पोलिस अधिकाऱ्यांनाही पाठवले होते. त्यासाठी दगडाचे खांबही लावण्यात आले. ते खांब आजही अस्तित्वात आहेत. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष व कोरोनामुळे वाढत्या मृत्यूनंतर ही सीमा आपोआप ओलांडली गेली आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “ही बातमीही नक्कीच वाचा.. वास्तव माहित नाही.. मात्र, वास्तव समजून घ्यायला मदत तर नक्कीच होईल की.. https://t.co/E1VUeE62s6” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply