Health : दिल्लीत डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये वेगाने वाढ (Dengue Increase In Delhi) होत आहे. रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्याने सोशल मीडियावर प्लेटलेट्सची मागणी करणाऱ्या संदेशांची संख्याही वाढली आहे. अशावेळी लोकांनी खूप (Health) काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
रक्तदाबाचे निरीक्षण करणे देखील आवश्यक असल्याचे येथील डॉक्टर सांगतात. डेंग्यूमध्ये, रुग्णाच्या प्लेटलेट्सच्या संख्येवर लक्ष ठेवण्यापेक्षा हेमॅटोक्रिट आणि रक्तदाबाचे निरीक्षण करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हेमॅटोक्रिट म्हणजे रक्तातील लाल रक्तपेशींच्या प्रमाणाची टक्केवारी. डेंग्यूवर उपचार करणे म्हणजे केवळ प्लेटलेट्स वाढविणे असे नाही. रक्तवाहिन्यांमधील गळती बरी झाल्यावरच सुरक्षित वाटेल. प्लेटलेट्सच्या संख्येपेक्षा त्याची गुणवत्ता महत्त्वाची आहे.
सध्या पावसाचे प्रमाण जास्त आहे. ऑक्टोबर महिन्यातही मुसळधार पाऊस होत आहे. या दिवसात कधी पाऊस होत नाही. मात्र, हवामानातील बदलांमुळे यंदा लोकांना ऑक्टोबर हिट जाणवलेली नाही. या महिन्यातही जोरदार पाऊस होत आहे. मान्सूनने माघार घेण्याचा काळही आता लांबला आहे. अशा परिस्थितीत किटकजन्य आजारांची वाढ होत चालली आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण घरोघर सापडत आहेत. तसेच डेंग्यूसारख्या घातक आजारांचेही प्रमाण वाढताना दिसत आहे.
उन्हाळ्यातील जास्त तापमानात डासांची संख्या कमी असली तरी पावसाळ्यात मात्र त्यांची संख्या वाढते. त्यामुळे या काळात रोगराईचे प्रमाणही जास्त असते. डासांमुळे अनेक आजारांचा फैलाव होतो. डेंग्यू, मलेरिया (Malaria), चिकुनगुण्या या आजारांचे प्रमाण राज्यात जास्त आहे. त्यामुळे या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
- Read : Dengue : डेंग्यूबाबत महत्वाची माहिती.. 5 वर्षात ‘या’ जिल्ह्यांत सापडले इतके रुग्ण; जाणून घ्या..
- Health Tips: हाय यूरिक ऍसिडची लक्षणे दिसताच हा पदार्थ खाणे टाळाच; नाहीतर किडनी होईल निकामी
- Malaria : मलेरियाबाबत महत्वाची बातमी.. ‘या’ पाच जिल्ह्यात सापडलेत ‘इतके’ रुग्ण; जाणून घ्या..