Disadvantages of drinking water while standing : पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. त्याशिवाय जीवनाची कल्पनाच अपूर्ण आहे. उन्हाळ्यात पाण्याची सर्वाधिक (Disadvantages of drinking water while standing) गरज असते. कारण, या ऋतूत दर 10-20 मिनिटांनी तहान लागते. पाण्याचे योग्य प्रकारे सेवन केल्यास फायदे तर आहेतच, पण ते चुकीच्या पद्धतीने प्यायल्याने नुकसानही होऊ शकते.
अनेकांना उभे राहून पाणी पिण्याची सवय असते, जी चुकीची आहे. असे केल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याला हानी होऊ शकते. तुम्हीही उभे राहून पाणी पित असाल तर आजच ही सवय सोडून देणे चांगले होईल.
उभे राहून पाणी पिण्याचे 5 नुकसान
किडनी समस्या (Kidney Problems) : उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला किडनीशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर उभे राहून पाणी पिऊ नका. असे केल्याने तुम्ही तुमच्या किडनीला हानी पोहोचवू शकता. यासाठी तुम्ही आरामात बसून हळूहळू पाणी प्यावे.
सांधेदुखीची समस्या (Joint Pain Problems) : तज्ज्ञांच्या मते उभे राहून पाणी पिण्याची सवय सांध्यांना नुकसादायक ठरू शकते. यासोबतच सांधेदुखीची लक्षणेही उद्भवतात. उभे राहिल्याने मज्जातंतूंमध्ये ताण येतो आणि या दरम्यान पाणी प्यायल्याने शरीरातील द्रव संतुलनावर परिणाम होतो, त्यामुळे सांधे दुखू लागतात.
फ्फुसांचे नुकसान (Lungs Problems) : जर तुम्हाला फुफ्फुसाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही उभे राहून पाणी पिणे टाळावे. कारण जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता त्यावेळी ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे फुफ्फुसापासून ते हृदयाच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होतो.
पचनाच्या समस्या (Digestion Problems) : तसे, पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. पण पाणी नीट न पिल्याने पचनक्रिया बिघडते. कारण जेव्हाही आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा पाणी वेगाने खाली जाते आणि पोटाच्या खालच्या भागात पोहोचते. मग हे पाणी पचनसंस्थेला हानीकारक ठरू शकते.
तहान लागणे (Feeling Thirsty) : तज्ज्ञांच्या मते, उभे राहून पाणी पिणे टाळावे. कारण असे केल्याने तहान भागत नाही. प्रत्येक वेळी पुन्हा पुन्हा पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळे वारंवार तहान लागल्यास उभे न राहता बसून पाणी प्यावे.