HDFC Bank : एचडीएफसी बँक आपल्या खातेधारकांसाठी अनेक सुविधा देत असते. जर तुमचेही या बँकेत खाते असेल तर बँकेने मोठा इशारा दिला आहे. ग्राहकांना आता ही सुविधा UPI पेमेंटवर मिळणार नाही.
एसएमएस सेवा राहणार बंद
HDFC बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की ती अल्प रकमेच्या UPI व्यवहारांवर कोणताही एसएमएस अलर्ट पाठवणार नाही. समजा एखाद्या व्यक्तीने HDFC बँक खात्यातून UPI द्वारे 100 रुपयांपर्यंत पैसे दिल्यास किंवा 500 रुपयांपर्यंतची रक्कम घेतली तर त्याला कोणताही एसएमएस अलर्ट मिळणार नाही.
आत्तापर्यंत असे होत आले आहे की, तुम्ही कोणताही व्यवहार करताच, बँकेकडून एक संदेश येतो की रक्कम कापली गेल्यास किंवा मिळाली आहे. छोट्या व्यवहारांसाठी बँक हा संदेश बंद करणार असून 100 रुपयांपेक्षा जास्त पाठवणाऱ्या आणि 500 रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळवणाऱ्यांना मेसेज मिळतील.
तर हे देखील लक्षात घ्या की एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनाही अशी सुविधा मिळणार नाही. एखाद्या ग्राहकाने 500 रुपयांपर्यंतचे क्रेडिट कार्ड व्यवहार केले तर त्याबाबत कोणताही एसएमएस पाठवण्यात येणार नाही. यूपीआय किंवा क्रेडिट कार्डद्वारे सर्व प्रकारच्या पेमेंटवर ई-मेल अधिसूचनेची सुविधा सुरू राहू शकतात.
एसएमएस अलर्टची ही सुविधा 25 जूनपासून बंद होणारअसून या बँकेने आपल्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातील ई-मेल अपडेट करण्यास सांगितले आहे जेणेकरुन त्यांना व्यवहारांबद्दल माहिती मिळेल.
कोट्यवधी रुपयांचा खर्च
प्रत्यक्षात बँक व्यवहाराशी संबंधित कोणताही संदेश पाठवत असून त्यावर बँक दररोज करोडो रुपये खर्च करते. या बँकेने सांगितले की, UPI व्यवहारांची सरासरी संख्या काही काळापासून कमी होत असून UPI वापरून छोट्या व्यवहारांची संख्या वाढत आहे.
लहान व्यवहार म्हणजे ज्यांचे मूल्य 100 रुपयांपर्यंत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या मतानुसार मागील वर्षी UPI व्यवहारांची संख्या वर्षाच्या अखेरीस 118 अब्जांवर गेली आहे.
UPI ॲप्स
हे लक्षात घ्या की Paytm, PhonePe आणि GooglePay हे देशातील ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम आणि मूल्याच्या बाबतीत आघाडीचे UPI ॲप्स आहेत. हे ॲप्स आजकाल UPI Lite चा प्रचार करत असून त्याच्या मदतीने, 500 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी कोणताही पासवर्ड किंवा पिन गरजेचं नाही. यामुळे बँकेला मेसेजद्वारे खिसा रिकामा करावा लागत नाही.