HDFC Bank : अर्रर्र! ग्राहकांना झटका, ‘या’ बँकेने केली गृहकर्जावरील व्याजदरात सर्वात मोठी वाढ

HDFC Bank : अनेकजण गृहकर्ज घेतात. सर्वात कमी व्याजदर असणाऱ्या बँकेकडून कर्ज घेण्यास ग्राहकांचा कल असतो. अशातच एका बँकेने आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे. कारण या बँकेने गृहकर्जावरील व्याजदरात सर्वात मोठी वाढ केली आहे.

बँकेच्या वेबसाइटवरून उपलब्ध माहितीनुसार, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या विलीनीकरणामुळे गृहकर्ज दरांमध्ये हा मोठा बदल झाला आहे. हे लक्षात घ्या की आता तो रिटेल प्राइम लेंडिंग रेटशी (आरपीएलआर) जोडण्यात येणार नाही.

जारी केले बँकेने FAQ

बँकेने जारी केलेल्या FAQ नुसार, तुमच्या खात्यावर लागू होणारा व्याजदर आता रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) ऐवजी EBLR (बाह्य बेंचमार्क लेंडिंग रेट) शी जोडण्यात येणार आहे. हे फ्लोटिंग व्याजदरांवरील नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असून विलीनीकरणानंतर ROI मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. इतकेच नाही तर भविष्यातील कोणतेही बदल EBLR वर आधारित असणार आहेत. नवीन रेपो लिंक्ड व्याजदर नवीन ग्राहकांना लागू असल्याचे बँकेने स्पष्ट केले असून जुने ग्राहक RPLR चालू ठेवू शकतात.

रेपो दर

बाह्य बेंचमार्क कर्ज दर RBI रेपो दराशी जोडले असून सध्याचा रेपो दर ६.५० टक्के इतका आहे. शिवाय रेपो दर हा व्याज दर असून ज्यावर भारताची मध्यवर्ती बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना कर्ज देत आहे. या आधारावर कर्ज घेणाऱ्यांचा ईएमआय ठरवण्यात येतो.

इतर बँकांमध्ये गृहकर्जाचे दर

हे लक्षात घ्या की ICICI बँकेतील गृहकर्जाचे दर 9 टक्के ते 10.05 टक्के दरम्यान असून स्टेट बँक ऑफ इंडियाचे गृहकर्ज दर 9.15 टक्के ते कमाल 10.05 टक्के आहेत. इतकेच नाही तर ॲक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 8.75 ते 9.65 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. तर कोटक महिंद्रा बँक ग्राहकांना 8.70 टक्के दराने कर्ज देत आहे.

Leave a Comment