HDFC Bank : HDFC बँकेकडून मोठे अपडेट! ग्राहकांना मिळणार नाही ‘ही’ सेवा

HDFC Bank : जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला बँकेच्या एका सेवेचा लाभ घेता येणार नाही. याचा परिणाम तुमच्या आर्थिक व्यवहारांवर होऊ शकतो.

एचडीएफसी बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसनुसार, एचडीएफसी बँक नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग ॲपवरील काही व्यवहार 25 मे रोजी म्हणजेच आजपासून पहाटे 3:30-6:30 पर्यंत उपलब्ध नसतील. बँकेच्या वेबसाइटनुसार, खाते उघडणे, ठेवी, निधी हस्तांतरण ऑनलाइन पेमेंट यांसारखे काही व्यवहार 25 मे 2024 रोजी पहाटे 03:30 ते 06:30 पर्यंत उपलब्ध नसणार आहेत. HDFC बँकेचे ग्राहक UPI द्वारे पेमेंट करू शकणार नाहीत.

स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरकर्ते

तुम्ही जर स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असून आता या क्रेडिट कार्डच्या कॅशबॅक रचनेत सुधारणा केली आहे. हे बदल 21 जून 2024 पासून लागू होणार आहेत. तर 21 जूनपासून मिळवलेला कोणताही कॅशबॅक Swiggy Money ऐवजी क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये पाहायला मिळणार आहे. याचा अर्थ कॅशबॅकमुळे पुढील महिन्याचे स्टेटमेंट शिल्लक कमी होऊन तुमचे बिल कमी होईल.

व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड

नुकतेच एचडीएफसी बँकेकडून डिजिटल क्रेडिट कार्ड पिक्सेल प्ले लाँच करण्यात आले आहे. या कार्डमध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळतील. ग्राहक त्यांच्या जीवनशैलीनुसार या कार्डचा लाभ घेतील. तर यात तुम्ही या कार्डची रचना निवडू शकता. तुम्ही तुमचा आवडता व्यापारी निवडू शकता आणि कॅशबॅक मिळवू शकता.

Leave a Comment