HDFC Axis Bank । HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट! ‘या’ लोकांना होणार फायदाच फायदा

HDFC Axis Bank । जर तुम्ही HDFC आणि Axis बँकेने ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बॅंकेने आता आपल्या ग्राहकांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. ज्याचा त्यांना फायदाच होईल.

एका वर्षाच्या मुदत ठेवीवर व्याज

HDFC बँक एका वर्षाच्या FD वर 6.60 टक्के व्याज देण्यात येत आहे. तर ॲक्सिस बँक फक्त एका वर्षासाठी FD वर 6.70 टक्के व्याज देण्यात येत आहे. इतर बँकांबद्दल बोलायचे झाले तर ICICI आणि SBI एका वर्षाच्या FD वर अनुक्रमे 6.70 टक्के आणि 6.8 टक्के व्याज देण्यात येत आहेत.

2 वर्षांच्या मुदत ठेवीवर व्याज

एचडीएफसी बँक दोन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत असून Axis Bank FD वर फक्त दोन वर्षांसाठी 7.10 टक्के व्याज देत आहे. इतर बँकांबद्दल बोलायचे झाले तर ICICI आणि SBI एका वर्षाच्या FD वर अनुक्रमे 7.20 टक्के आणि 7 टक्के व्याज देण्यात येत आहेत.

3 वर्षांच्या मुदत ठेवीवर व्याज

एचडीएफसी बँक तीन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत असून ॲक्सिस बँक केवळ तीन वर्षांसाठी एफडीवर 7.10 टक्के व्याज देत आहे. इतर बँकांबद्दल बोलायचे झाले तर ICICI आणि SBI एका वर्षाच्या FD वर अनुक्रमे 7 टक्के आणि 6.75 टक्के व्याज देण्यात येत आहेत.

बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अँड सिंध बँकांनी केले महत्त्वाचे बदल

हे लक्षात घ्या की बँक ऑफ इंडियाने 30 जून 2024  पासून एफडीवरील व्याजदरात बदल केला असून आता बँक ऑफ इंडिया ज्येष्ठ नागरिकांसाठी 666 दिवसांच्या कालावधीत सर्वात जास्त 7.80% व्याज देत आहे. तर त्याच वेळी, इतर व्यक्तींसाठी, FD वर समान दिवसांसाठी 7.3% पर्यंत जास्तीत जास्त व्याज देण्यात येईल.

पंजाब आणि सिंध बँकेने 1 जुलै 2024 पासून एफडीवरील व्याजदरात बदल केला असून पंजाब अँड सिंध बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी 666 दिवसांच्या एफडीवर 7.80% व्याज दर दिला जात आहे. तर त्याच वेळी, इतर व्यक्तींसाठी, त्याच कालावधीसाठी FD वर जास्तीत जास्त 7.3% पर्यंत व्याज दिले जात आहे.

Leave a Comment