Hatkanangale Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू (Hatkanangale Lok Sabha Election) झाली आहे. राजकीय पक्षांकडून जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत तर उमेदवारांच्या नावाची घोषणाही केली जात आहे. यंदा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघाची वेगळीच चर्चा आहे. या मतदारसंघात अटीतटीची लढत होणार असे आता संकेत मिळाले आहेत. शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी भारतीय जवान किसान पार्टी हातकणंगलेसह नऊ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, रघुनाथ दादा पाटील हे स्वतः हातकणंगले मतदारसंघातून निवडणुकीत शड्डू ठोकणार आहेत. यामुळे हातकणंगले मतदारसंघाची निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.
रघुनाथ दादा पाटील यांनी (Raghunath Patil) आज कोल्हापुरात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढण्यास नकार देण्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. जुने सहकारी राजू शेट्टी यांच्यावरही त्यांनी टीका केली.
Maharashtra Lok Sabha | मविआ जोमात, महायुती कोमात! ‘त्या’ 9 मतदारसंघात एकमत होईना
Hatkanangale Lok Sabha Election
रघुनाथ दादा म्हणाले, यंदा भाजपला 200 जागांचा टप्पा पार करता येणार नाही. कारण भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर जनता प्रचंड नाराज आहे. मागील हंगामात ऊस दरवाढीवरून केलेले आंदोलन निरर्थक ठरल्याची टीका त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत माहिती देताना रघुनाथ दादा म्हणाले, कोल्हापूर, हातकणंगलेसह नऊ मतदारसंघात भारतीय जवान किसान पक्ष निवडणूक लढणार आहे. त्यांच्या या घोषणेनंतर या मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीच्या होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून धैर्यशील माने तर महाविकास आघाडीने सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे दादा गौडा पाटीलदेखील निवडणूक लढवत आहेत. यामध्ये आता रघुनाथ दादा पाटील यांची एन्ट्री झाली आहे. या मतदारसंघात आता उमेदवारांची संख्या पाच झाली आहे.
Hatkanangale Lok Sabha Election
राजू शेट्टींनी नाकारला ठाकरेंचा प्रस्ताव
संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आम्ही मागील तीन ते चार वर्षांपासूनच तयारी सुरू केली होती. परंतु संघटनेतील काही सदस्यांचे असे मत होते की महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा. तर दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडणार अशी वक्तव्य महाविकास आघाडीचे नेतेमंडळी करत होती. या मतदारसंघात उमेदवार देऊ नका अशी मागणी करत मी दोन वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.