Hatkanangale Lok Sabha | CM शिंदेंचं मोठं यश; कोल्हापुरात आले चर्चा केली अन् बंडखोरी टळली

Hatkanangale Lok Sabha Election 2024 :  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास (Hatkanangale Lok Sabha Election 2024) आघाडी दोघांनाही बंडखोरीचा त्रास सहन करावा लागत आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीत जरा जास्तच धुसफूस आहे. महायुतीने आतापर्यंत 39 मतदारसंघात उमेदवार दिले आहेत परंतु 9 मतदारसंघात अजूनही उमेदवार देता आलेले नाहीत. या मतदारसंघात एकमत करण्याचा प्रयत्न करत होत असतानाच महायुतीला हातकणंगलेत मोठा धक्का बसला होता.

या मतदारसंघात दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत प्रकाश आवाडे यांनी निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टेन्शन वाढले होते. परंतु आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आव्हाडे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर आवाडे यांचे बंड शांत करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले आहे. यामुळे महायुतीसह येथील उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Hatkanangale Lok Sabha Election | हातकणंगलेत मोठा ट्विस्ट! राजू शेट्टींना भिडणार जुना सहकारी

Hatkanangale Lok Sabha

प्रकाश आवाडे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी हातकणंगलेमधून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले होते. मात्र कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाडे यांची मनधरणी केली. यानंतर आवाडे यांनी उमेदवारीचा निर्णय सोडून दिल्याचे सांगितले जात आहे.

याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आवाडे यांनी दोन दिवसांपूर्वी चर्चा केली होती. या चर्चेनंतरही आवाडे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. इतकेच नाही तर मंगळवारी ते उमेदवारी अर्ज देखील भरणार होते. मात्र आज महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आवाडे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांत काही काळ चर्चा झाली. या चर्चेनंतर आवाडे यांचे बंड शांत झाल्याचे सांगण्यात येत आहे. या चर्चेवेळी मंत्री शंभूराजे देसाई आणि माजी मंत्री रामदास कदम देखील उपस्थित होते.

Sangli Lok Sabha Election | सांगलीत भाजपला धक्का! ‘या’ माजी आमदाराचा राजीनामा; विशाल पाटलांना पाठिंबा

Hatkanangale Lok Sabha

कोण आहेत प्रकाश आवाडे ?

पाच वर्षांपूर्वी प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अपक्ष निवडणूक लढवून ते आमदार झाले होते. नंतरच्या काळात भारतीय जनता पार्टीचे सहकारी सदस्य म्हणून प्रकाश आवाडे यांना ओळखले जात होते. परंतु असे असतानाही त्यांनी हातकणंगले मतदारसंघात निवडणूक लढवून महायुतीला अडचणीत आणण्याचे भूमिका घेतली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आवाडे यांनी न मागता भाजपला पाठिंबा दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.

हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना महायुतीने पुन्हा उमेदवारी दिली आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीला मागील महिन्याभरापासून आवाडे व त्यांच्या कुटुंबियांकडून विरोध केला जात होता. प्रकाश आवाडे यांचे पुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी सुरुवातीलाच स्वतः लोकसभा निवडणूक लढणार अशी घोषणा केली होती. मात्र त्या आधीच माने यांचे महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राहुल आवाडे यांनी माघार घेतली. मात्र त्यानंतरही माने यांना असलेला त्यांचा विरोध कायम राहिला होता.

Raver Lok Sabha | नाराजी उफाळली! शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; रावेरात नेमकं काय घडलं?

यानंतर स्वतः प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीच्या नेत्यांचे टेन्शन वाढले होते. प्रकाश आवाडे यांना कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी केली जात होती. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्याच्या निमित्ताने कोल्हापुरात आले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. दोघांमध्ये चर्चा झाली आणि प्रकाश आवाडे यांनी उमेदवारीचा निर्णय सोडून देण्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment