Hathras Stampede : मुलांना मारहाण अन्..,भावाच्या पत्नीने केला भोले बाबाचा पर्दाफाश! वाचा सविस्तर

Hathras Stampede: 2 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील हाथरसमधील सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीतील रतीभानपूर गावात भोले बाबा यांच्या सत्संगात 122 भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणानंतर घटनास्थळावरून भोले बाबा फरार झाला आहे.

माहितीनुसार, या धक्कादायक घटनेत आतापर्यंत 122 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास यूपी पोलीस करत असून अद्याप पोलिसांना भोले बाबा कुठे आहे याची महिती मिळालेली नाही. 

माहितीनुसार, भोले बाबा (सूरज पाल उर्फ ​​बाबा साकार हरी) यांच्या सत्संगाला हजारो लोक उपस्थित होते. यावेळी त्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी एवढी गर्दी जमली की मोठा अपघात झाला.  

मदत आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हाथरसमध्ये सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृतांची संख्या 122 वर पोहोचली असून 28 जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, घटनेपासून बाबा फरार आहे. मात्र, त्याच्या शोधात पोलिसांनी मैनपुरी जिल्ह्यातील राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये शोधमोहीम राबवली मात्र बाबा सापडला नाही.

डेप्युटी एसपी सुनील कुमार म्हणाले की आम्हाला बाबा जी कॅम्पसमध्ये सापडले नाहीत.  तर 4 जिल्ह्यांचे डॉक्टर आणि प्रशासन घटनास्थळी सतत हजर असून जखमींवर उपचार सुरू आहेत.  सीएम योगींनी 24 तासांत घटनेचा अहवाल मागवला आहे.  दरम्यान, बाबाच्या धाकट्या भावाच्या पत्नीचे एक वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हजारो अनुयायी असलेले बाबा आपल्याच भावाच्या निधनानंतरही घरी आला नव्हता असं भोले बाबा यांच्या धाकट्या भावाची पत्नीने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

बाबांचा आता त्यांच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. बाबांनी एकदा आपल्या मुलांनाही मारहाण केली होती. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. यासोबतच त्या महिलेने सांगितले की, ती कधीही भोले बाबांच्या सत्संगाला गेली नाही. त्या लोकांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.  यासोबतच स्वत:च्या भावाच्या मृत्यूनंतरही तो आला नसल्याचा दावा महिलेने केला आहे.

Leave a Comment