Haryana Politics : हरियाणात राजकीय नाट्य! CM खट्टर यांचा राजीनामा; ‘या’ नेत्याच्या हाती राज्याची कमान

Haryana Politics : हरियाणा राज्यात आज मोठा राजकीय भूकंप (Haryana Politics) झाला. लोकसभा निवडणुका अगदी जवळ (Lok Sabha Elections) आलेल्या असताना भाजप-जेजेपी यांची युती (BJP-JJP) तुटली. आगामी निवडणुकीसाठी जागावाटपात दोन्ही पक्षांत समाधानकारक तोडगा न निघाल्याने युती तुटली. यानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी (Manohar Lal Khattar) राज्यपालांची भेट घेत त्यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. परंतु, यातही राज्यात पुन्हा भाजपाचेच सरकार येईल याची काळजी घेण्यात आली. घडलेही तसेच. या घडामोडींनंतर आज दुपारी नायब सिंह सैनी (Nayab Singh Saini) यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सैनी यांना माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Haryana CM) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते.

या घडामोडीत जेजेपी पक्षाचे चार आमदार देवेंद्र बबली, ईश्वर सिंह, जोगीराम आणि राम निवास शपथविधी सोहळ्यासाठी हजर राहिले. तर दुसरीकडे माजी मंत्री अनिल वीज गैरहजर राहिले. त्यांनी पक्ष नेतृत्वाला स्पष्ट शब्दांत सांगितले की मी ज्युनियर नेतृत्वाच्या हाताखाली काम करणार नाही. नायब सिंह सैनी यांना मंगळवारी विधिमंडळ नेता म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. याआधी मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर थोड्यात नायब सिंह सैनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

Congress Candidate First List : काँग्रेसची पहिली यादी जाहीर; राहुल गांधी ‘या’ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात

Haryana Politics

राज्यातील भाजप आणि जेजेपी यांची युती तुटणार अशा चर्चा मागील आठवड्यापासूनच सुरू झाल्या होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा झाली. यानंतर बैठकीत एक अहवाल सादर करण्यात आला. त्यात असे म्हटले होते की राज्यातील जाट समुदाय मनोहरलाल खट्टर यांच्यावर नाराज आहे.

यानंतरही जर खट्टर मुख्यमंत्रिपदी कायम राहिले तर जाट मतदार काँग्रेसकडे जाऊ शकतात असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. यानंतर रणनीती तयार करण्यास सुरुवात झाली आणि मनोहरलाल खट्टर यांना राजीनामा देणे भाग पडले.

Haryana Politics

कोन आहेत नायब सिंह सैनी

मागील लोकसभा निवडणुकीत नायब सिंह सैनी कुरुक्षेत्र मतदारसंघातून विजयी झाले होते. सध्या ते हरियाणा बीजेपी अध्यक्ष आहेत. सैनी ओबीसी समाजातून येतात. मनोहरलाल खट्टर यांचे निकटवर्तीय म्हणून ते राज्याच्या राजकारणात ओळखले जातात. मनोहरलाल खट्टर यांच्या सहमतीनेच मुख्यमंत्रिपदासाठी सैनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Congress First List : दिग्गज अन् ज्येष्ठ नेते निवडणुकीच्या रिंगणात; काँग्रेसच्या प्लॅनिंग नेमकं काय?

Leave a Comment