मुंबई : ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात सोमवारी रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला. नंतर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारणात कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. ‘हर हर महादेव’ चित्रपट आपण पाहिला नसून नेमका वाद काय आहे हे आपल्याला ठाऊक नाही. मात्र लोकशाही पद्धतीने विरोध करावा असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
तसेच, “लोकशाही माध्यमातून विरोध करण्यास पूर्णपणे परवानगी आहे. मात्र लोकशाहीच्या विरोधात जाऊन एखाद्या ठिकाणी लोकांना मारहाण करण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. या प्रकरणात कारवाई होईल,” असं उत्तर दिलं. या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फडणवीस यांना चित्रपटासंदर्भात विचारलं असता त्यांनी, “मी चित्रपट पाहिला नाही. त्यात काय वाद आहे मला माहिती नाही. कुणाला त्याबद्दल आक्षेप असतील तर ते सनदशील मार्गाने मांडावेत. मात्र मल्टीप्लेक्समध्ये शिरुन तिथल्या लोकांना मारहाण करणं, त्यांच्याशी दादागिरी करणं हे सहन केलं जाणार नाही,” असं फडणवीस म्हणाले आहेत.
must read
- Ladyfinger recipe :जीरा भातासोबत सर्व्ह करा ‘सलन वाली भिंडी’, टेस्ट पाहून व्हाल हैराण
- Best Winter Destinations: हिवाळ्यात भेट देण्यासाठी ” ही ” ठिकाणे एक्सप्लोर करा ;आनंद होईल द्विगुणित