KRUSHIRANG
    Facebook Twitter Instagram
    Trending
    • Samsung Galaxy : फक्त साडेसहा हजारांत मिळतोय हा शानदार स्मार्टफोन; पहा, काय आहे डील ?
    • Small Saving Schemes : मोदी सरकारची मोठी घोषणा; ‘या’ स्कीमच्या व्याजदरात केली वाढ
    • Foods For Lung Health : फुफ्फुसांचं आरोग्य जपा! ‘या’ पदार्थांचा आहारात आजच करा समावेश
    • Waste Economy : कचऱ्यातून बक्कळ कमाई! पहा, कशी भरतेय सरकारची तिजोरी ?
    • Small Scale Business : फक्त 1 लाखांत सुरू करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल फायदा, होईल भरभराट
    • Responsibilities of Father :  मुलांच्या पालनपोषणात फक्त आईच नाही बाबाही जबाबदार; ‘या’ टीप्सचा करा विचार
    • Team India : BCCI नं टाळलं, विदेशात नाव काढलं; ‘हा’ खेळाडू गाजवतोय मैदान
    • Gold Price Today: ग्राहकांनो, 10 ग्रॅम सोन्याचा भाव घसरला! संधी गमावली तर करावा लागेल पश्चाताप; जाणुन घ्या नवीन दर
    Facebook Twitter Instagram
    KRUSHIRANG
    • ताज्या बातम्या
      • आंतरराष्ट्रीय
      • ट्रेंडिंग
      • पर्यावरण
    • कृषी व ग्रामविकास
      • पोल्ट्री (कुक्कुटपालन)
      • पशुसंवर्धन (डेअरी)
      • बाजारभाव (मार्केट)
      • शेतीकथा
      • हवामान
    • महाराष्ट्र
      • अहमदनगर
      • कोल्हापूर
      • नागपूर
      • नांदेड
      • जळगाव
      • नाशिक
      • मुंबई
      • पुणे
      • सोलापूर
    • राष्ट्रीय
      • क्रीडा
      • तंत्रज्ञान
      • शिक्षण आणि रोजगार
      • फेक न्यूज
      • रोजगार
      • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
      • आरोग्य सल्ला
      • मराठी गोष्टी
      • पाककला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • महिला वर्ल्ड
      • आरोग्य व फिटनेस
    • अर्थ आणि व्यवसाय
      • सरकारी योजना
      • उद्योग गाथा
    • राजकीय
      • निवडणूक
      • ब्लॉग (लेख)
    • पीकपद्धती व सल्ला
      • तेलबिया
      • कडधान्य
      • तृणधान्य
      • फलोत्पादन
      • भाजीपाला
    • माहिती व मार्गदर्शन
      • अर्ज आणि कायदा सल्ला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • शेतकरी उत्पादक कंपनी
      • महत्त्वाची माहिती व दुवे
    • माझी ग्रामपंचायत
      KRUSHIRANG
      Home»Live News»Harbhara Farming Tips: हरबरा पीक व्यवस्थापन संपूर्ण माहिती सिंगल क्लीकवर; पेरणी ते डाळ प्रक्रिया याबद्दलही वाचा की
      Live News

      Harbhara Farming Tips: हरबरा पीक व्यवस्थापन संपूर्ण माहिती सिंगल क्लीकवर; पेरणी ते डाळ प्रक्रिया याबद्दलही वाचा की

      SM ChobheBy SM ChobheJuly 16, 2023Updated:July 16, 2023No Comments23 Mins Read
      chickpea harbara plant
      Share
      Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

      Harbhara Farming Tips (chickpea / gram or Bengal gram, chhana, chana, or channa, garbanzo or garbanzo bean, or Egyptian pea): ‘प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ज्ञांची’ या लेखनमालेमध्ये शेतकऱ्यांना शेती उपयोगी अशी माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील मजकूर आम्ही यामध्ये प्रसिद्ध करत आहोत. यावर आपणास काहीही प्रश्न किंवा मार्गदर्शन हवे असल्यास टीम कृषीरंगच्या मोबाइल नंबरवर टेक्स्ट मेसेज किंवा व्हाटस्अॅप मेसेज करावा. यामध्ये सर्व पिकांची आणि पशुपालन याबद्दल माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. ही माहिती वाचण्यासाठी रहा टीम कृषीरंग समवेत..

      प्रश्न:  हरभरा पिकाचे शेती आणि मानवी आहारामध्ये महत्व काय आहे?

      उत्तर: हरमरा है पीक कडधान्य वर्गातील असल्यामुळे या पिकाच्या मुळावर नत्राच्या ग्रंथीअसतात. हवेतील मुक्त नत्र पानाद्वारे शोधून रायझोबियम जिवाणूमार्फत मुळावरील ग्रंथीत स्थिर केला जातो. अशा प्रकारे है पीक तयार झाल्यानंतर साधारणत: ७५ ते ६० किलो प्रति हेक्टर नत्र खताची उपलब्धता जमीनीमध्यवादते. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होऊन सुपिकता टिकुन राहते. तसेच पुढील पिकाकरिता उत्तम बेवड तयार होते. है पीक ज्वारी, करडई, ऊस इ. पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेता येते. हरभन्यामध्ये १२- २३ टक्के प्रथिने तसेच खनिजे व जीवनसत्त्वे यांचे प्रमाण उत्तम असते, मानवी शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आवश्यक असणारे प्रथिने या मार्फत मोठया प्रमाणात उपलब्ध होतात. तसेच पशुखाद्यामध्येही या कडधान्याचा वापर केला जातो. अशा प्रकार हरभरा पिकाचे शेती आणि मानवी आहारामध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे.

      प्रश्न : हरभरा पिकाचे महाराष्ट्र राज्यात, देशात आणि जगामध्ये क्षेत्र किती आहे?

      उत्तर : महाराष्ट्र राज्यामध्ये हरभरा पिकाखाली १३.९५ लाख हेक्टर (२०१०-११). भारतामध्ये ८.७५ दशलका हेक्टर (२०१०-११), तर जगामध्ये ११.०८ दशलक्ष हेक्टर (२००८- ०९) इतके क्षेत्र आहे.

      प्रश्न : हरभरा पिकाचे महाराष्ट्र राज्यात, देशात आणि जगामध्ये किती उत्पादन मिळते ?

      उत्तर : महाराष्ट्र राज्यामध्ये हरभरा पिकापासुन १३.०१ लाख टन (२०१०-११) भारतामध्ये ८.२५ दशलक्ष टन (२०१०-११), तर जगामध्ये ९.७७ दशलक्ष टन (२००८-०९) इतके उत्पादन मिळते.

      प्रश्न :  हरभरा पिकाची महाराष्ट्र राज्यात, देशात आणि जगामध्ये किती उत्पादकता आहे ?

      उत्तर :  महाराष्ट्र राज्यामध्ये हरभरा पिकाची ९३३ किलो /हे (२०१०-११) मारतामध्ये ९४३ किलो/हे (२०१0-११), तर जगामध्ये ८८२ किलो/हे (२००८-०९) इतकी उत्पादकता आहे.

      प्रश्न : हरभऱ्याचे मुख्य प्रकार कोणते आहेत?

      उत्तर : हरभ-याचे मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला देशी हरभरा आणि दुसरा काबुली हरभरा, देशी हरभरा तपकिरी, हिरव्या रंगाचा असतो काबुली हरभरा पांढरा असतो. देशी हरभरा हा समशितोष्ण प्रदेशात चांगला येतो. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने देशी हरभराच पिकविला जातो, देशी हरभ-यामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता चांगली असते. डाळ व बेसनपीठ उद्योगामध्ये प्रामुख्याने देशी हरभराच वापरला जातो. काबुली हरभऱ्याचा वापर चना मसाला, चना भटोरा आणि छोले या भाजीकरीता होतो. यापासुन डाळ केली जात नाही. तसेच बेसनपीठ अथवा फुटाणे सुध्दा केले जाते नाहीत. काबुली हरभरा हा हवामानातील बदलाला संवेदनशील असतो.

      प्रश्न : काबुली हरभरा लावताना काय काळजी घ्यावी?

      उत्तर : काबुली वाणाचे बियावरील आवरण पातळ असल्यामुळे ते पाणी लागल्यावर कुजून जाते त्यामुळे उगवणीवर परिणाम होतो. म्हणून काबुली हरभरा प्रथम जमिन ओलावुन वाफशावर येताच पेरणी करावी लागते. तसेच काबुली हरभरा सरी वरंब्याला टोकण करुन पाणी दिल्यासचांगली उगवण होते. तुषार सिंचनावर काबुली हरभऱ्याची लागवड केल्यास उगवण अतिशयचांगली होउन या पिकाचे चांगले उत्पादन मिळते.

      प्रश्न : हरभरा पिकासाठी कशा प्रकारची जमिन आवश्यक असते?

      उत्तर : हरभरा पिकास मध्यम ते भारी (४५ ते ६० से.मी खोल), पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, मुसमुसीत जमिन आवश्यक असते. हलकी, चोपण अथवा पाणथळ,क्षारयुक्त जमिन हरभरा लागवडीसाठी वापरु नये.

      प्रश्न : या पिकाकरीता हवामान कसे असावे लागते?

      उत्तर : हरभ-यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते. विशेषतः पीक २० दिवसाचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणत, १० ते १५ अंश से.. आणि कमाल तपमान २५ ते ३० अंश सें.ग्रे.असेल तर पिकाची वाढ चांगली होउन भरपूर फांद्या, फुले आणि धाटे लागतात.

      • Samsung Galaxy : फक्त साडेसहा हजारांत मिळतोय हा शानदार स्मार्टफोन; पहा, काय आहे डील ?
      • Small Saving Schemes : मोदी सरकारची मोठी घोषणा; ‘या’ स्कीमच्या व्याजदरात केली वाढ
      • Foods For Lung Health : फुफ्फुसांचं आरोग्य जपा! ‘या’ पदार्थांचा आहारात आजच करा समावेश
      • Waste Economy : कचऱ्यातून बक्कळ कमाई! पहा, कशी भरतेय सरकारची तिजोरी ?
      • Small Scale Business : फक्त 1 लाखांत सुरू करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल फायदा, होईल भरभराट

      प्रश्न :  हरभरा पिकाकरीता पुर्वमशागतीचे महत्व काय आहे ?

      उत्तर : हरभरा पिकाची मुळे खोलवर जात असल्याने खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (२५ से.मी.) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळया दयाव्यात. तत्पूर्वी हेक्टरी ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत पसरावे. खरीप हंगामात शेणखत किंवा कंपोस्ट खत दिले असल्यास हरभ-यास पुन्हा वेगळे देण्याची गरज नाही. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन हरभरा लागवडीकरीता स्वच्छ करावी.

      प्रश्न : हरभरा पिकाच्या पेरणीची योग्य वेळ कोणती?

      उत्तर : जमिनीतील ओलावा आणि हवेतील तापमान याचा विचार करुन पेरणीची वेळ निश्चित करावी लागते. आपल्याकडे १५ ऑक्टोंबरनंतर सहसा पाउस पडत नसल्याने जिरायत क्षेत्रात हरभ- याची पेरणी खरिपाचे पीक निघाल्याबरोबर शक्यतो सप्टेंबरच्या दुसरा पंधरवाडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडया पर्यंतच जिरायत हरभरा पेरणी पुणे करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभ-याची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेबरच्या दरम्यान करावी. म्हणजे हरभरा पिकाचा फुलोरा कालावधी आणि घाटे लागण्याचा कालावधी चांगल्या थंडीमध्ये येतो. थंडीस पोषक असणारे हे पीक असल्यामुळे डिसेंबर -जानेवारी महिन्यातील थंडी या पिकास चांगली मानवते आणि त्यापासुन चांगले उत्पादन मिळण्यास उपयोग होतो. तसेच बागायत क्षेत्रात ५ से.मी. खोलीवर हरभरा पेरणी केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होउन उगवण उशीरा आणि । कमी होते. पिकाची वाढ कमी होउन फांद्या, फुले, घाटे कमी लागतात. यासाठी पीक पेरणी वेळेवर होणे महत्वाचे असते.

      प्रश्न : जिरायत हरभऱ्याच्या  चांगल्या उगवणीसाठी काय करावे?

      उत्तर: यासाठी बियाणे ४-५ तास पाण्यात भिजवून त्याची पेरणी करावी. पेरणी शक्यतो १० सेमी खोलीवर करावी.

      प्रश्न : या पिकाकारीता पेरणी अंतर काय वापरावे ?

      उत्तर : हरभरा पेरणी करताना दोन ळीतील अंतर ३० सेभी. आणि दोन रोपातील अंतर १० से.भी. राहील अशा पध्दतीने पेरणी करावी म्हणजे रोपांची संख्या प्रति हेक्टरी अपेक्षित (३,३३,३३३) राहुन उत्पादन चांगले मिळते. तीन फुट रंदीच्या सर्या पाडून वरंब्याच्या दोनही बाजूस हरभरा टोकण केल्यास सुध्दा अतिशय चांगले हरभरा उत्पादन मिळते. काबुली वाणाकरीता ४५ x १० सेंमी अंतरावर पेरणी करावी. हरभरा सरी वरव्यांवरही चांगला येतो. काबुली वाणासाठी जमीन ओलावुन वापशावर पेरणी करावी त्यामुळे उगवण चांगली होते.

      प्रश्न : हरभरा पिकाकरीता कोणती बीजप्रक्रिया व कशी करावी?

      उत्तर : बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी, पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास प्रथम ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा अथवा २ ग्रॅम थायरम 4 २ ग्रॅम कार्बेडेंझीम एकत्र करुन चोळावे. यांनतर १० किलो बियाण्यास २५० ग्रॅमि रायझोबियम जीवाणू संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गुळ घेवून तो विरघळेपर्यत पाणी कोमट करावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभ-याच्या मुळाक्रील ग्रंथीचे प्रमाण वाढते व हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेवून पिकास उपलब्ध केलाजातो आणि पिकाचे उत्पादन वाढते.

      प्रश्न : हरभरा पिकाचे प्रति हेक्टरी बियाणे किती वापरावे?

      उत्तर : हरभ-याच्या दाण्यांच्या विविध आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरावे, म्हणजे हेक्टरीरोपाची संख्या अपेक्षित मिळते. फुले जी-१२ या लहान दाण्यांच्या वाणांकरिता ६० ते ६५ किलो, विजय या मध्यम दाण्यांच्या वाणांकरीता ६५ ते ७० किलो, तर विश्वास, विशाल, दिग्विजय आणि विराट या टपो-या दाण्यांच्या वाणाकरिता १०० किलो तर जास्त टपो-या दाण्याच्या कृपा या काबुली वाणाकरीता १२५- १३० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.

      प्रश्न : हरभरा पिकाचे सुधारित व अधिक उत्पादनशील तसेच रोग प्रतिकारक्षम प्रचलित वाण कोणते?

      उत्तर : हरभरा पिकाचे उदा. चाफा, एन-५९, एन ३१, विकास, विश्वास, फुले जी-१२, हिरवा चाफा, बी.डी.एन.९-३ इ. वाण लागवडीकरीता प्रसारीत झालेले आहेत. तथापि खालील तक्त्यात दर्शविलेले अधिक उत्पादनशील आणि रोग प्रतिकारक्षम वाणाचीच लागवडीसाठी निवड करणे योग्य ठरते.

      सुधारित वाणकालावधी(दिवस)उत्पादनवैशिस्टे
      विजयजी.८५-९० बा. : १०५-११०जिरायत: १४-१५ क्वि.\हे बागायत: ३५-४० क्विं.\हे उशिरा पेर: १६-१७ क्विं.\हे    अधिक उत्पादन क्षमता, मररोग, प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस, योग्य, आवर्षन प्रतिकारक्षम, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातराज्याकरिता प्रसारित
      विशाल११०-११५जिरायत: १४-१५ क्विं.\हे बागायत: ३०-३५ क्विं.\हेआकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षम, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्राकरिता प्रसारित
      दिग्विजयजी: ९०-९५ बा: १०५-११०जिरायत: १४-१५ क्विं.\हे बागायत: ३५-४० क्विं.\हे उशिरा पेर : १८-२० क्विं.\हेपिवळसर तांबूस, टपोरे दाणे मर रोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्राकरिता प्रसारित
      विराट११०-११५जिरायत: १०-१२ क्विं.\हे बागायत: ३०-३२ क्विं.\हेकाबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
      कृपा१०५-११०सरसरी उत्पादन बागायत: १६-१८ क्विं.\हे उत्पादन क्षमता : ३०-३२ क्वि.\हेजास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, दाणे सफेद पांढऱ्या या रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांकरिता प्रसारित.
      पी.के.व्ही. के.-२११०-११५बागायत: २६-२८ क्विं.\हेअधिक टपोरे दाणे असणारा काबुली वाण, महाराष्ट्र राज्यांकरिता प्रसारित
      पी,के.व्ही.के.-४१००-११०सरसरी उत्पादन बागायत : १६१८जास्त टपोरे दाणे, काबुली वाण, आकर्षक बाजारभाव, अधिक उत्पादन, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
      बिडीएन जी – ७९७१०५-११०जिरायत: १४-१५ क्विं.\हे बागायत: २०-२२ क्विं.\हेमध्यम आकाराचे दाणे, मराठवाडा विभागासाठी प्रसारित

      प्रश्न : हरभऱ्याच्या सुधारित वाणांचे बियाणे कसे उपलब्ध होईल ? त्याचे सर्वसाधारण दर काय आहेत?

      उत्तर : हरभऱ्याचे सुधारित वाण कृषि विद्यापीठामार्फत शेतकरी बांधवांना लागवडीसाठी प्रसारीत केले जातात. या सुधारित वाणांचे बियाणे विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रावर रब्बी हंगाम सुरु होण्यापुर्वी एक महिना अगोदर बियाणे विक्री केली जाते. या सुधारित वाणांचे सत्यप्रत बियाणे देशी वाणाकरिता साधारणतः ३०-३५ रु. आणि काबुली वाणाकरिता ५०-५५ रु. असे सर्वसाधारण दर आहेत. यामध्ये बाजारभावानुसार बियाण्याच्या दरात दरवर्षी बदल केला जातो. कृषि विद्यापीठाव्यतिरिक्त महाबीज कार्यालय, कृषि सेवा केंद्र तसेच प्रगतशील शेतकरीबांधव यांचेकडेही बियाणेची उपलब्धता होऊ शकते.

      • Samsung Galaxy : फक्त साडेसहा हजारांत मिळतोय हा शानदार स्मार्टफोन; पहा, काय आहे डील ?
      • Small Saving Schemes : मोदी सरकारची मोठी घोषणा; ‘या’ स्कीमच्या व्याजदरात केली वाढ
      • Foods For Lung Health : फुफ्फुसांचं आरोग्य जपा! ‘या’ पदार्थांचा आहारात आजच करा समावेश
      • Waste Economy : कचऱ्यातून बक्कळ कमाई! पहा, कशी भरतेय सरकारची तिजोरी ?
      • Small Scale Business : फक्त 1 लाखांत सुरू करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल फायदा, होईल भरभराट

       प्रश्न : ढगाळ हवामानाचा हरभन्यावर काय विपरीत परिणाम होतो ?

      उत्तर : हरभरा हे पीक थंड हवामानास प्रतिसाद देणारे पीक आहे. तथापि ढगाळ हवामान असल्यास थंडीचे प्रमाण फारच कमी होते. हे वातावरण पिकास मानवत नाही आणि पिकास फांद्या, दुय्यम फांदया प्रमाणात फुले लागणे तसेच घाटयामध्ये दाणे भरण्यावर सुध्दा विपरीत परिणाम दिसुन येतो. एकुणच पिकाची वाढ मंदावते आणि उत्पादनात घट याव्यतिरिक्त ढगाळहवामानामुळे घाटे अळीसारख्या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.

       प्रश्न :  हरभऱ्यावर लिव्होसिन किंवा काही टॉनीक फवारावे काय?

      उत्तर : हरभरा पिकावर वाढरोधक संजीवके उदा. लिव्होसिन, सी. सी. सी., सायकोसिल इ. ची फवारणी करण्याची आवश्यकता नसते. अलीकडे बाजारामध्ये अनेक प्रकारचे टॉनिक विक्रीसाठी उपलब्ध असतात. तथापि विद्यापीठ प्रक्षेत्रावर घेण्यात आलेल्या प्रयोगानुसार असे टॉनिक फवारण्याची आवश्यकता नसते. यासाठी पीक फुलोऱ्यात असतांना दोन टक्के युरियाची फवारणी करावी (१०० लि पाण्यात २ किलो युरीया). त्यानंतर आणखी १२-१५ दिवसांनी वरील युरियाची फवारणी करावी. तसेच पीक पेरणी करतांनी २० किलो गंधक आणि २५ किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे.

      प्रश्न: अधिक फायद्यासाठी देशी हरभरा करावा की काबुली?

      उत्तर: देशी हरभ-यापासुन उदा. विजय, विशाल, दिग्विजय या वाणांपासुन अनेक शेतकरी बाधव १२ते१४ किंव,/एकर असे उत्पादन घेतात. सध्यस्थितीमध्ये साधारणपणे तीन हजार रुपये प्रति क्विटल बाजारभाव देशी वाणास मिळतो, म्हणजेच ३६०००/- रु प्रति एकर एवढे उत्पन्न मिळ शकते. अशाच प्रकारे मध्यम काबुली वाणांकरीता बाजारभाव मिळतो तथापि काबुली हरमन्याचे उत्पादन देशी वाणापेक्षा कमी मिळते. अलिकडे कृषि विद्यापीठाने जास्त टपोन्या दाण्यांचे वाण काबुली हरभन्यामध्ये प्रसारित केले आहेत. त्यास अतिशय आकर्षक असा बाजारभाव मिळतो. या जास्त टपोऱ्या दाणे असलेल्या वाणांचे उत्पादन कमी जरी असले तरी त्यास भाव चांगला मिळाल्यामुळे त्याचे एकुण उत्पादन आणि नफा सर्वाधिक मिळतो. मात्र काबुली हरभरा लागवड करतांनी विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा उगवण अतिशय कमी होऊन उत्पादनात मोठी घट येते. जास्त टपोन्या काबुली हरभन्याची लागवड योग्य पध्दतीने केल्यास त्यापासुन मिळणारे उत्पादन आणि नफा नेहमीच देशी हरमन्यापेक्षा अधिक असतो.

      प्रश्न: हरभ्याच्या शेतात काही जागी मर होते ती टाळण्यासाठी काय करावे?

      उत्तर: हरभरा पिकावरील मर रोग टाळण्यासाठी या रोगास प्रतिकारक्षम असणार्या वाणांचीच लागवडीसाठी निवड करणे गरजेचे असते. उदा. विजय, विशाल, दिग्विजय, विराट, बी.डी.एन.जी. ७९७, साकी ९५१६, जाकी ९२१८ ई. तसेच बियाणे पेरणी करतांनी दोन ग्रॅम थायरम अधिक २ गेम बावीस्टिन किंवा ५ ग्रॅम टायकोडमा प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. यामुळे हरभरा पिकाचे रोपावस्थेत मर रोगापासुन संरक्षण होते.

      प्रश्न : हरभरा पिकाची लागवड सरी वरंबापध्दतीने कशी करावी?

      उत्तर : हरभरा हे पीक सरी वरंबा पध्दतीने लागवड केल्यास अतिशय चांगला प्रतिसाद देते. सरी वरंबा लागवड पध्दतीमध्ये हरभ-यास हवे तेवढे माफक स्वरुपात पाणी देणे सोईचे होते त्यामुळे हरभरा पीक पाण्यामुळे उभळण्याचा धोका टळतो. मध्यम ते भारी जमिनीसाठी ९० सेमी रुंदीच्या स-या पाहुन वरंब्याच्या दोनही बाजुस मध्यावर हरभरा बियाणे १० सेंमी अंतरावर टोकण करावे. हलक्या ते मध्यम जमिनीकरीता ७५ सेमी रुंदीच्या स-या पाडन वरंब्याच्या दोन्ही बाजूस हरभरा टोकण करावा. सरी वरंबा पध्दतीमध्ये हरभऱ्याच्या मुळास भुसभुशीत जमिन मिळाल्यामुळे पीक अतिशय जोमदार वाढते, परिणामी उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे दिसुन येते.

      प्रश्न: हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी खत व्यवस्थापन कशा पध्दतीने करावे?

      उत्तर : सुधारित हरभऱ्याचे नवे वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देतात, त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. प्रति हेक्टरी चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पिकाची पेरणी करताना २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजेच १२५ किलो डायअमोनियम फॉस्फेट (डी.ए.पी) अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश अथवा ५० किलो युरिया आणि ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट + ५०किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरला द्यावे. संतुलित खतांच्या वापरामुळे उत्पादनात १८.५५ टक्के इतकी वाढ झाल्याचेप्रयोगांती आढळून आले आहे.

      प्रश्न: या पिकाकरीता फवारणी पध्दतीने रासायनिक खत कसे द्यावे?

      उत्तर : हरभरा पीक फुलो-यात असताना २ टक्के युरियाची पहिली फवारणी (१००लिटर पाण्यात २ किलो युरीया) आणि त्यांनतर १०-१५ दिव्सांनी परत दूसरी एक फवारणी करावी. युरियाच्या फवारणीस पीक प्रतिसाद देऊन पीक उत्पादनात वाढ होते.

      प्रश्न : हरभरा पिकाकरीता कोणती सुक्ष्म अन्नद्रव्ये वापरावीत?

      उत्तर : या पिकाकरीता पेरणी करतांनी २० किलो गंधक, २५ किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरीवापरावे. सुक्ष्म अन्नद्रव्याच्या या खत मात्रेस पीक प्रतिसाद देते आणि पीक उत्पादन वाढण्यासमदत होते.

      प्रश्न : या पिकाकरीता आतरमशागत कधी आणि कशाप्रकारे करावी ?

      उत्तर : पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३०- ४५ दिवसात शेत तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. पीक २०-२५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३०-३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमिनीस पडलेल्या भेगा बुजल्या जाउन जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होउन ओल अधिक काळ टिकण्यासमदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊ रोपांना मातीची भर लागते. कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. यासाठी गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. तण व्यवस्थापनामुळे एकूण उत्पादनात २०.७४ टक्के वाढ होते.

      प्रश्न  : हरभऱ्याची खुडणी करावी की करू नये?

      उत्तर : हरभरा पिकास फुलोरा येताना त्यावर मॅलिक अॅसिड (आब) तयार होत असते. याचवेळी बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याची खुडणी करुन भाजीसाठी हा खुडलेला हरभरा वाळवून वर्षमर आहारात भाजीकरीता वापरला जातो, अशा फुलोऱ्याच्या अवस्थेत भाजी खुडल्यानंतर त्यावर कुठलाही दुष्परीणाम न होता, त्याचे उत्पादन आहे तेवढेच मिळते. म्हणुन आपल्याला गरज असेल तेवढी जरुर भाजी खुडली तरी चालते. त्याचा उत्पादन कमी किंवा जास्त असा कोणताही परिणाम होत नाही.

      प्रश्न : उगवुन आलेल्या हरमन्यामध्ये कोणते तणनाशक मारावे?

      उत्तर : हरभरा उगवुन आल्यानंतर कोणतेही तणनाशक मारु नये. तथापि पेरणी करताना उक्षवरणीपुर्व फ्ल्युक्लोरॉलिन (बासालीन) किंवा पेंडिमिथिलिन (स्टॉम्प) या तणनाशकांची २.५ ते ३ लिटर प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यातून फवारणी जमीनीत पुरेसा ओलावा असतानी करावी.

      प्रश्न : हरभरा पिकासाठी पाणीव्यवस्थापन कशा पध्दतीने करावे ?

      उत्तर : जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येवू लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबाधंणी करताना दोन सा्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुध्दा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमीनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळया पुरेशा होतात. त्याकरिता ३० -३५ दिवसांनी पहिले व ६०-६५ दिवसांनी दुसरे पाणी दयावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सेंमी पाणी लागतें. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ से.मी.) देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठया भेगा पडू देवू नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६० टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते.

      • Samsung Galaxy : फक्त साडेसहा हजारांत मिळतोय हा शानदार स्मार्टफोन; पहा, काय आहे डील ?
      • Small Saving Schemes : मोदी सरकारची मोठी घोषणा; ‘या’ स्कीमच्या व्याजदरात केली वाढ
      • Foods For Lung Health : फुफ्फुसांचं आरोग्य जपा! ‘या’ पदार्थांचा आहारात आजच करा समावेश
      • Waste Economy : कचऱ्यातून बक्कळ कमाई! पहा, कशी भरतेय सरकारची तिजोरी ?
      • Small Scale Business : फक्त 1 लाखांत सुरू करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल फायदा, होईल भरभराट

      प्रश्न : या पिकासाठी तुषार सिंचन पध्दतीने पाणी देणे योग्य असते का?

      उत्तर : हरभरा पिकास तुषार सिंचन पध्दतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन अतिशयउत्कृष्ट पध्दत आहे. तुषार सिंचन पध्दतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. सारा, सरी-वरंबा यासारख्या पध्दतीने पाणी दिल्यास जमिन दाबून बसते व जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होतो व त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. नेहमीच्या पध्दतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुजसारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते. परंतु तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येत असल्याने मुळकुज रोगामुळे होणारे नुकसानटाळता येते. नेहमीच्या पाणी देण्याच्या पध्दतीत जास्त पाण्यामुळे पिकास दिलेली को अन्नद्रव्ये वाहून किंवा खोलवर जाण्याची शक्यता असते. शिवाय वाफसा लवकर के नसल्याने अन्नद्रव्ये, खते पिकास उपलब्ध होतीलच याची खात्री नसते. मात्र तुषार सिंचन पध्दतीमध्ये जमीनीत नेहमीच वाफसा स्थिती राहत असल्यामुळे पिकास दिलेली सर्व करे पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वाफसा स्थितीमुळे पिकाची अन्नदव्ये शोषण्याची क्षमता वाढते. अशा रितीने तुषार सिंचन पध्दतीने हरभरा पिकास पाणी दिल्यास हरभरा उत्पादनातआशादायक आणि भरीव वाढ होते.

      प्रश्न : तुषार सिंचन पध्दतीने या पिकास पाणी दिल्यास या पिकावरील आंब (मेलिक असिड) धुवुन जाते याचा या पिकावर दुष्परिणाम होतो का?

      उत्तर : हरभरा पिकास फुलोरा असतांना आंब मोठ्या स्वरूपात असते. याच दरम्यान तुषार सिंचन पध्दतीने पाणी दिल्यास या पिकावरील ही आंब धुवुन जाते. त्यानंतर ५-६ दिवसातच पुन्हा ही आंच नैसर्गिकरित्या तयार होते. पिकाची फुलगळ होत नाही तसेच पिकास कमी फुले किंवा कमी धाटे लागणे असे होत नाही. त्यामुळे या तुषार सिंचनाचा या पिकावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. तथापि या तुषार सिंचन पदतीने पाणी दिल्याने हरभरा पीक उत्पादन वाढ झाल्याचे दिसुन येते.

      प्रश्न :  हरभरा पिकामध्ये कोणकोणती आंतर पीके घेतली जातात?

      उत्तर : हरभरा पीक मोहरी, करडई, ज्वारी, उस या पिकाबरोबर आंतरपीक म्हणुन घेता येते.हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक ध्यावे. हरभ-याच्या सहा ओळी आणि रवी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वस्याच्या टोकावर १० सें.मी. अंतरावर हरमन्याची एक ओळ टोकण केल्यास हरभ-याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते.त्याबरोबरच हरभ-याचा बेवड उसाला उपयुक्त ठरून उसाच्या उत्पादनात वाढ होते.

      प्रश्न : हरभरा पिकावरील घाटे अळीचे प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक किड नियंत्रण कसे करावे?

      उत्तर : हरभरा पिकावर रोपावस्थेत मावा, वाळवी, देठ कुरतडणारी अळी व उंट अळी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. परंतु पिकाचे आर्थिक मोठे नुकसान घाटे अळीमुळेच होते. घाटे अळी सुरुवातीला कोवळी पाने, फुले, कळ्या व नंतर घाटयातील कोवळे दाणे खात असते. या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास पीक चांगले येउनहीं पुढे ३० ते ४० टक्के उत्पादनात घट येवू शकते. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा अवलंब करणे अधिक महत्वाचे आहे.

      १) घाटे अळी ही कीड हरम-याव्यतिरिक्त तूर. मका, सूर्यफुल, टोमेंटो, भेंडी, करडई कापूस, ज्वारी, वाटाणा इ. पिकावर उपजिविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिक घेतली असल्यास अशा जमिनीत हरमन्याचे पीक घेवू नये. पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत.

      २) जामिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे मागील हंगामातील किडीचे कोष पृष्ठभागावर येउन त्यांचा पक्षांपासून अथवा सूर्याच्या उष्णतेने नाश होतो.

      ३) हरभरा पिकाबरोबर गहू, मोहरी, जयस अथवा कोर्थीबीर ही पिके मिश्र अथवाआंतरपिके म्हणून घेतल्यास घाटे अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.

      ४) पिकाची वेळेवर कोळपणी व खुरपणी करावी.

      ५) हेक्टरी १०-१२ कामगंध (फेरोमोन) सापळे लावावेत. यामध्ये अडकलेल्या पतगांचा नाश करावा, म्हणजे पुढील प्रजननास आळा बसतो.

      ६) कीटकनाशकांचा वापर शक्यतो पट्टा अथवा खंड फवारणी पध्दतीने करावा. म्हणजेकीटकनाशकाच्या फवारणी खर्चात निम्मी बचत होउन परोपजिवी /परभक्षी किडीचेसंरक्षण होते.

      ७) हरभरा पिकास फुलकळी येवू लागताच, ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी. त्यासाठी ५ किलो निंबोळी भुकटी १० लिटर पाण्यात रात्रभर मिजत ठेवावी. सकाळी कापडाच्या सहाय्याने त्याचा अर्क काढावा. त्यामध्ये आणखी ९० लिटर पाणी टाकावे तसेच त्यात २० ग्रॅम कपड़े धुप्याची पावडर मिसळावी. नंतर है मिश्रण अध्धा एकर क्षेत्रावर फवारावे. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी न्युक्लिअर पॉलिहैड्रॉसीस व्हायरस (एच.ए.एन. पी. व्ही.) म्हणजेच हेलिओकील ५०० मि.ली.. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. यानंतर फारच आवश्यक असेल तर अशावेळी प्रवाही क्लोरपायरीफॉस २० टक्के. १२५० मि.ली. किंवा प्रवाही स्पार्क ३६ टक्के, १२५० मिलि ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. हरभरा पिकामध्ये घाटे अळीचे प्रमाण फारच जास्त असेल अशा वेळेला प्रवाही स्पिनोसॅड ४५ एस सी २०० मिली ५०० लिटर पाण्यातुन प्रति हेक्टरी फवारावे.

      ८) हरमरा पिकात पक्ष्यांना बसण्यासाठी दर १५-२० मीटर अंतरावर काठया रोवाव्यात किंवा मचान बांधावीत म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या. साळुकी, बगळे इ. घक्षी पिकावरील अळया पकडून खातात. कीड नियंत्रण प्रभावी होण्याकरिता एकाच कीटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणीकरिता आलटून-पालटून औषधे फवारावीत.

      प्रश्न : या पिकावर कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो?

      उत्तर : हरभरा पिकावर मुख्यत्वे मर, मुळकुज, मानकुजव्या आणि खुजा इ. रोगांचा प्रादुर्भाव दिसूनयेतो.

      प्रश्न : हरभरा पिकावरील रोगांची थोडक्यात लक्षणे काय आहेत?

      उत्तर : मर: हा रोग फ्युजेरिअम ऑक्झीस्पोरम या बुरशीमुळे होतो. रोगामुळे कोवळी रोपे कोमजतात आणि कोमजलेल्या रोपाचा रंग हिरवाच टिकुन राहतो व रोगग्रस्त रोपे जमिनीवर लोळतात.

      मुळकुजः कोरडी मुळकुज हा रोग रायझोक्टोनिया बटाटीकोला या बुरशीमुळे होते. या रोगामुळे झाड सुकुन चिपाडाच्या रंगाची होतात. मुळे ठिसुळ होतात. आणि मुळे कुजून गेल्यामुळे रोप जागेवर वाळुन जाते. मुळकूज रोगात रोप सहजासहजी उपटले जाते.

      ओली मुळकूज: हा रोग रायझोक्टोनिया सोलनी या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे रोपे पिवळी पवन मरतात व वाळुन जातात. रोगग्रस्त झाड सहजासहजी उपटले जाते. खोड आणि मुळे कुजून जातात.

      मान कुजव्या : हा रोग स्क्लेरोसियम रोल्फसाय या बुरशीमुळे होतो. मानकुजव्या रोगाम जमिनीलगत रोपाच्या मानेला बुरशीमुळे साल वाळते. या रोगामुळे रोपे पिवळी पडूनमरतात व वाळतात. मानकुजव्या रोगाचा प्राद्भर्भाव पिकाच्या रोपावस्थेत (४५ हि दिसतो.

      खुजा : (स्टंट व्हायरस) हा रोग पीलीफ रोलर या विषाणूमुळे होतो. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते, पेर कांडी लहान पडतात. पाने छोटी होऊन पिवळी, नारंगी किंवा तपकिरी होतात. जास्त प्रादुर्भावीत पाने लालसर जाड आणि कठीण होतात.

      • Samsung Galaxy : फक्त साडेसहा हजारांत मिळतोय हा शानदार स्मार्टफोन; पहा, काय आहे डील ?
      • Small Saving Schemes : मोदी सरकारची मोठी घोषणा; ‘या’ स्कीमच्या व्याजदरात केली वाढ
      • Foods For Lung Health : फुफ्फुसांचं आरोग्य जपा! ‘या’ पदार्थांचा आहारात आजच करा समावेश
      • Waste Economy : कचऱ्यातून बक्कळ कमाई! पहा, कशी भरतेय सरकारची तिजोरी ?
      • Small Scale Business : फक्त 1 लाखांत सुरू करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल फायदा, होईल भरभराट

      प्रश्न : हरभरा पिकावरील रोगनियंत्रण कसे करावे?

      उत्तर : हरभरा पिकावर मुख्यत्वे मर, मुळकुजव्या, मान कुजव्या आणि खुजा इ. रोग आढळून येतात. या रोगामुळे झाडे सुकतात व मरतात. याकरिता पिकाची तृणधान्याबरोबर फेरपालट करावी. हरभरा मर रोग प्रतिकारक वाणांची उदा. विजय विशाल, दिग्विजय, विराट इ. वाणांची पेरणी करावी. बियाण्यास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम बावीस्टीन अथवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. रोगग्रस्त जमिनीत हरभऱ्याचे पीक घेउ नये. उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. मूळकुजव्या रोग होवू नये म्हणून पिकास वरचेवर पाणी देवू नये व पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. उशिरा पेरणी टाळावी. खुजारोगग्रस्त झाडे दिसून येताच उपटून नष्ट करावीत.

      प्रश्न : डाळ प्रक्रियेचे महत्व काय आहे?

      उत्तर : भारत देशामध्ये कडधान्य उत्पादन १७-१८ दशलक्ष टन होते. यापैकी १०-१२ लाख टन हरभरा उत्पादन महाराष्ट्रातून होते. हरभरा उत्पादनापैकी जास्तीत जास्त हरभऱ्याचा उपयोग डाळ तयार करण्याकरिता केला जातो. डाळ तयार करण्याच्या प्रक्रियेत हाताळणी, साठवण, वाहतूक, प्रक्रिया आणि विक्री यामध्ये २५ टक्कयांपर्यंत घट येते. खेडयामध्ये पीठ गिरणीचा डाळ तयार करण्यासाठी वापर करतात. यामध्ये ५८ टक्क्यांपर्यंत डाळीचा उतारा मिळतो. मात्र सुधारित डाळ मिलचा वापर केल्यास डाळीचा उतारा ८० टक्क्यांपर्यंत वाढतो. म्हणून सुधारित डाळ मिलचा वापर अधिक डाळ उतारा मिळण्याकरिता अधिक प्रमाणात होणे आवश्यक आहे.

      प्रश्न : हरभरा डाळ प्रक्रिया कशी करावी?

      उत्तर : डाळ तयार करण्याकरीता वापरावयाचे धान्य: डाळीची प्रत व उतारा हा विविध बाबींवर अवलंबून असतो. यामध्ये टरफले, ल्याची कठीणता, रासायनिक गुणधर्म, धान्याचा आकार व आकारमान, आर्द्रतेचे प्रमाण आणि साठवणीतील किडींपासून कडधान्याचे किती प्रमाणात नुकसान झालेले आहे. या सर्व बाबींचा समावेश झालेला असतो. म्हणून डाळीकरीता वापरावयाचे कडधान्य चांगल्या प्रतीचे वापरले पाहिजे.

      धान्य स्वच्छता, वाळविणे आणि प्रतवारी : उत्तम प्रतीची डाळ मिळण्याकरीता धान्यातील अनावश्यक इतर मिश्रण व झाडांची तुसे, कार्डीकचरा इ. स्वच्छ करुन घ्यावे. धान्यात आर्दता जास्त असेल तर डाळीस टरफलाचे प्रमाण अधिक राहते. याकरीता धान्य उन्हात अधिक वेळ वाळविले पाहिजे, जेणे करुन त्यामध्ये ८ ते १० टक्के आर्द्रता राहील. जास्त वाळविल्यावर सुध्दा धान्यास कडकपणा येउन डाळीची फूट जास्त निघते. चांगली डाल निघण्याकरीता एकसारख्या आकाराची धान्याची प्रतवारी करावी.

      प्रश्न: डाळ तयार करण्याच्या पध्दती कोणत्या आहेत?

      उत्तर : डाळ तयार करण्याच्या दोन पध्दती आहेत. एक धान्य मिजदुन डाळ तयार करणे आणि दुसरी धान्य न भिजवता डाळ तयार करणे.

      प्रश्न: धान्य भिजवून डाळ तयार करण्याची प्रक्रिया कशी करावी?

      उत्तर: भीजवून झाळ तयार करण्याच्या प्रक्रियेत स्वच्छता, प्रतवारी, पाण्यात १ ते १.३० तास धान्य भिजविणे, वाळविणे व डाळ तयार करणे इत्यादी बाबी काळजीपूर्वक कराव्या लागतात. म्हणजे उच्च प्रतीची डाळ मिळू शकते, हरभरा, मूग, उडीद करीता १ ते १.३० तास धान्य पाण्यात मिजवावे लागले. तर तुराकरीता २ ते ३ तास धान्य मिजवावे लागते. यामध्ये हलके धान्य, फोलपट, तुस, इ. धान्यापासून वेगळे काढले जातात. त्यानंतर धान्य १ ते २ दिवस उन्हात दाळविले जाते जेणे करुन त्यामध्ये ८ ते १० टक्के आर्द्रता राहील. जास्त वाळविल्यावर सुध्दा धान्यास कडकपणा येऊन डाळीची फूट जास्त निघते.

      प्रश्न:  धान्य न भिजविला डाळ तयार करण्याची प्रक्रिया कशी करावी?

      उत्तर : यामध्ये डाळ तयार करण्यासाठी स्वच्छता, प्रतवारी,वाळविणे, भरडणे, तुस वेगळे काढणे व चांगली डाळ वेगळी करणे इ. मुद्दे येतात. धान्याचे टरफल निघण्याकरीता धान्यास 0.३५ टक्के (१०० किलो धान्य + ३५० ग्रॅम गोड़तेल) चोळावे. त्यानंतर धान्यावर थोडे पाणी शिपड़ावे, व नंतर ८ ते १० टक्क्यांपर्यंत धान्यातील आर्द्रता येण्याकरीता साधारण ८ ते ९ तास सूर्यप्रकाशात वाळवावे. यानंतर डाळ मिल मशिनमध्ये डाळ तयार करावी. अशा पध्दतीत उच्च प्रतिची डाळमिळते. एकदा डाल केल्यानंतर साठवणीतील किडींचा प्रादुर्भावही धान्यापेक्षा डाळीस कमी होतो. लघु उद्योगासाठी वापरण्यात येणा-या यंत्रापासून ४ ते ५ क्विटल प्रति तास या क्षमतेने डाळ तयार होते. या उच्च प्रतीच्या डाळीस बाजारभाव चांगला मिळतो. डाळ प्रक्रियेत थायमीन आणि रिबोफलेवीन यांचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो. तर प्रथिने काही प्रमाणात नाश पावते. मात्र डाळ प्रक्रियेत पाचकता, गुणवत्ता आणि प्रथिनाची उपयुक्तता यांमध्ये समाधानकारक वाढ दिसून येते. अशा प्रकारे धान्यापासून डाळ तयार केल्यास अधिक अर्थिक फायदा होतो. बाजारात वर्षभर डाळीस चांगली मागणी असते. प्रत्यक्ष हरभरा धान्य विक्रीपेक्षा शेतकरी बांधवांनी डाळ तयार करुन विक्री केल्यास मोठ्या स्वरुपात अर्थिक लाभ होउ शकतो.

      प्रश्न : हरभऱ्यामध्ये पाचकता नीट न होऊ देणारे कोणते घटक असतात?

      उत्तर : हरमन्यामध्ये टॅनिन फायटिक अॅसीड, कोलीन, ऑक्झॅलीक अँसिड, सॅपोनीन, ट्रीप्सीन, आणि कायमोट्रीप्सीन इ. अपोषक द्रव्ये असल्यामुळे हे घटक अन्न पाचकता न होऊ देण्याचे कार्य करतात. त्यामुळे हरभऱ्यापासुन तयार केलेले पदार्थ प्रमाणातच खावे लागतात. अथवा आहारात त्याचा वापर प्रमाणात ठेवावा लागतो. अन्यथा शरीराची पाचकता बिघडते.

      प्रश्न : हरभरा पिक घेतल्यानंतर जमीनीमध्यकिती टक्क्यापर्यंत नत्राची उपलब्धता वाढते?

      उत्तर : हरभरा हे पीक हवेतील मुक्त नायट्रोजन पानाद्वारे शोषुन त्याचे मुळावर असणाऱ्या ग्रंथीमध्ये रायझोबियम जिवाणूद्वारे त्याचे स्थिरीकरण केले जाते. यामुळे साधारणतः ४५-६० टक्के नत्राची उपलब्धता जमीनीमध्ये वाढते. याचा फायदा हरभरा पीक काढल्यानंतर घेण्यात येणाऱ्या पिकास चांगला होतो.

      प्रश्न : हरभरा पिकावर घाटे अळीव्यतिरिक्त इतर कोणकोणत्या किडी नुकसानकारक ठरतात?

      उत्तर : हरभरा या पिकावर एकुण ५४ किडीचा प्रादुर्माव दिसुन येतो. तथापि हरभरा पिकाचे मुख्य नुकसान घाटे अळी या किडीपासुन होते (२०-४०%), या व्यतिरिक्त या पिकावर उपजिविका करणाऱ्या अनेक किडी आहेत. मात्र या किडीमुळे हरभरा पिकाचे विशेष नुकसान होत नाही. या किहीमध्ये मावा, वाळवी, देठ कुरतडणारी अळी, व उंट, अळी इ. किडीचा समावेश आहे.

      प्रश्न : हरभरा पिकावर विशेष नुकसान करणारे रोग कोणते आहेत ?

      उत्तर : या पिकाचे मुख्य नुकसान मर या रोगामुळे होते. हा रोग सर्वदुर दिसुन येतो या व्यतिरिक्त मुळकूज (ओली मुळकूज आणि कोरही मुळकूज), काळी मुळकूज, मान कुजव्या आणि खुजा तसेच लोह कमतरतेची तीव्र लक्षणे असे विविध रोग या पिकावर आदळुन येतात.

      प्रश्न : हरभरा साठवणीमध्ये कोणत्या किडींमुळे नुकसान होते ?

      उत्तर : हरभरा पीक काढून झाल्यावर लगेचच पोत्यामध्ये साठवण करुन ठेवुन दिल्यास त्यास सोंड किडीमुळे मोठे नुकसान होते (ब्रुचीड बिटल) याकरिता पीक काढल्यानंतर धान्यास चांगलेउन्हात वाळविणे महत्वाचे असते.

      प्रश्न : सोडकिडीमुळे हरभरा धान्याचे साठवणुकीमध्ये नुकसान होऊ नये म्हणुन काय खबरदारी घ्यादी?

      उत्तर : हरभरा पीक घाटे वाळू लागताच काढून घ्यावे, अन्यथा जास्त वाळल्यावर धाटे गळ फार होते. त्यांनतर खळ्यावर हरभरा २-३ दिवस चांगला याळवून मळणी करावीं. साठवणीयूर्वी हरभरा धान्य ५-६ दिवस चांगले कडक उनहात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोंदट व ओलसर जागेत करु नये. शक्य असल्यास कडधान्यास एक टक्का लिंबोळी किंवा मोहाचे किंवा करंज किंवा एरंडीचे तेल चोळावे किंवा कडुनिबाचा पाला (५ टक्के) धान्यात मिसळून धान्य साठवावे. यामुळे धान्य साठवणीतील किडीपासून सुरक्षित राहते.

      प्रश्न : हरभरा पीक उत्पादन घटकांचा उत्पादनावर कसा परिणाम होतो? हरभरा पीक उत्पादन घटकांचा खालील प्रमाणे परिणाम दिसुन येतो.

      अ.क्रघटकउत्पादन घट (%)
      १.नियंत्रित(उत्पादन वाढीकरिता कोणतेही न वापरलेले घटक )६०.४८
      २एकूण पिक उत्पादन तंत्रज्ञान–
      ३.एकूण पिक उत्पादन तंत्रज्ञान वजा खतमात्रा१८.५५
      ४.एकूण पिक उत्पादन तंत्रज्ञान वजा जीवाणू खाते३.३२
      ५.एकूण पिक उत्पादन तंत्रज्ञान वजा पिक संरक्षक११.११
      ६.एकूण पिक उत्पादन तंत्रज्ञान वजा पाणी व्यवस्थापन४७.५४
      ७.एकूण पिक उत्पादन तंत्रज्ञान वजा तणनियंत्रण२०.७४

      प्रश्न: हरभऱ्याचे कोणकोणतीही घटकद्रव्ये असतात ?

      उत्तर: हरभऱ्यामध्ये खालीलप्रमाणे घटकद्रव्ये असतात

      प्रश्न: हरभरा पिकाचे अर्थशास्र काय आहे ?

      उत्तर: हरभरा पिकास खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे उत्पादन खर्च येतो. पिकाचे सुधारित वाण वापरून तंत्रज्ञान जोड देऊन योग्य जमिनीत लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळून समाधानकारक नफा होतो.

      तपशीलसरसरी उत्पादन (क्विं\हे.)बाजारभाव(रु.\क्विं )एकूण उत्पादन (रु.\हे.)उत्पादन खर्च (रु.\हे.)निव्वळ नफा (रु.\हे.)
      मध्यम टपोरे आकराचे दाण्यांचे वाण (दिग्विजय, विशाल)२२.००२५००\-५५,००० \-२०,५०० \-३४,५०० \-
      मध्यम टपोरे आकराचे दाण्यांचे काबुली वाण (विराट, विहार)१७.००३०००\-५१,००० \-१८,१०० \-३२,९०० \-
      जास्त टपोरे आकराचे दाण्यांचे काबुली वाण कृपा१८.००४५००\-८१,-०००\-२२,१०० \-५८,९४० \-

      स्त्रोत :
      पुस्तकाचे नाव : प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ञांची (वर्ष २०१७)
      संकलक : डॉ. आनंद सोळंके, डॉ. कल्याण देवळाणकर, प्रा. मंजाबापू घोरपडे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. संदीप पाटील
      कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
      वेबसाईट : www.mpkv.ac.in ; फोन : ०२४२६ २४३८६१ ; ईमेल : [email protected]
      पुस्तक आर्थिक सहाय्य : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अहमदनगर (कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य)

      कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 08830113528 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा.. *(टायपिंग चूक झाल्यास क्षमस्व. त्याबद्दल प्रतिक्रिया लिहून सहकार्य करावे, ही वाचकांना नम्र विनंती)

      chickpea / gram or Bengal gram Harbhara Farming Tips marathi डाळ प्रक्रिया हरबरा पीक व्यवस्थापन हरबरा पेरणी व डाळ
      Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
      SM Chobhe
      • Facebook
      • Twitter

      News Editor, Krushirang

      Related Posts

      5G Smartphone: संधी सोडू नका! 15 हजारपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा ‘या’ जबरदस्त 5G स्मार्टफोन

      September 28, 2023

      Renault Triber : जबरदस्त! होणार बंपर बचत; ‘या’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर MPV कार्स

      September 28, 2023

      Post Office Scheme: पती-पत्नीसाठी सर्वात भारी पोस्ट ऑफिस स्कीम; आजच करा गुंतवणूक काही वर्षात होणार करोडपती

      September 28, 2023

      Leave A Reply Cancel Reply

      Samsung Galaxy : फक्त साडेसहा हजारांत मिळतोय हा शानदार स्मार्टफोन; पहा, काय आहे डील ?

      September 29, 2023

      Small Saving Schemes : मोदी सरकारची मोठी घोषणा; ‘या’ स्कीमच्या व्याजदरात केली वाढ

      September 29, 2023

      Foods For Lung Health : फुफ्फुसांचं आरोग्य जपा! ‘या’ पदार्थांचा आहारात आजच करा समावेश

      September 29, 2023

      Waste Economy : कचऱ्यातून बक्कळ कमाई! पहा, कशी भरतेय सरकारची तिजोरी ?

      September 29, 2023

      Small Scale Business : फक्त 1 लाखांत सुरू करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल फायदा, होईल भरभराट

      September 29, 2023

      Responsibilities of Father :  मुलांच्या पालनपोषणात फक्त आईच नाही बाबाही जबाबदार; ‘या’ टीप्सचा करा विचार

      September 29, 2023
      Facebook Twitter Instagram Pinterest
      © 2023 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

      Type above and press Enter to search. Press Esc to cancel.