World Cup 2023 : भारतीय संघाचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंह (Harbhajan Singh) म्हणाला, की 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) दोन खेळाडूंची निवड न झाल्याने मी आश्चर्यचकित आहे. आगामी विश्वचषकात भारताला लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांची उणीव भासू शकते, असा विश्वास हरभजन सिंगला वाटतो.
भारतात 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. बीसीसीआयने (BCCI) मंगळवारी विश्वचषक 2023 साठी 15 सदस्यीय भारतीय संघाची (Team India) घोषणा केली.
हरभजन काय म्हणाला ?
हरभजन सिंहने स्टार स्पोर्ट्स शोमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंह यांची निवड न झाल्याने मला आश्चर्य वाटते. माझ्या मते 2023 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात दोन खेळाडूंची कमतरता आहे. अर्शदीप सिंह आणि युजवेंद्र चहल यांची निवड न झाल्याने मला आश्चर्य वाटते. चहल हा सामना विजेता आहे. तो मधल्या ओव्हर्समध्ये विकेट घेतो. ते तुमचे मुख्य शस्त्र असेल. त्याने अनेक प्रसंगी स्वत:ला सिद्ध केले.
अर्शदीप सिंह हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. भारतीय संघात अर्शदीप सिंह मोठी भूमिका बजावू शकला असता. मी संघ व्यवस्थापनात असतो तर या दोन खेळाडूंची नक्कीच निवड केली असती. अर्शदीप आणि चहलची निवड न झाल्याने मला खरोखरच आश्चर्य वाटते.
भारतीय संघात खूप ताकद आहे आणि ते यावेळी जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. 12 वर्षांचा दुष्काळ संपवून रोहित ब्रिगेड चमकदार ट्रॉफी आपल्या हातात घेईल, असा विश्वास हरभजन सिंहने व्यक्त केली. “मला आशा आहे की भारतीय संघ विश्वचषकाचे विजेतेपद निश्चितपणे जिंकेल आणि यासह 12 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपेल.”