Hair Fall : केसगळती थांबवण्यासाठी आहारात करा ‘ही’ जीवनसत्त्वे असणाऱ्या पदार्थांचा समावेश, आठवड्यातच समस्या होईल दूर

Hair Fall : हे लक्षात घ्या की निरोगी केसांसाठी प्रथिने, ब जीवनसत्व, लोह आणि जस्ताने समृध्द असलेले पदार्थ खूप गरजेचे असतात. अनेकजणांना केसगळतीची समस्या जाणवते. पण तुम्ही जीवनसत्त्वे असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल.

व्हिटॅमिन ए

केसांच्या पेशी हा शरीराचा सर्वात वेगाने वाढणारा भाग असून यासाठी जीवनसत्त्वे योग्य इंधन आहे. ज्यावेळी तुमचे शरीर व्हिटॅमिन ए शोषून घेते तेव्हा ते सेबम तयार करते. हे टाळूला मॉइश्चरायझ करून तुमच्या केसांच्या पेशी निरोगी ठेवते. जर व्हिटॅमिन ए ची कमतरता असली तर तुम्हाला केस गळण्याची समस्या होऊ शकते.

व्हिटॅमिन सी

ऑक्सिडेटिव्ह तणाव हे केस गळण्याचे एक प्रमुख कारण आहे. असे घडते ज्यावेळी आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्सचे असंतुलन असते ज्यामुळे इलेक्ट्रॉन असंतुलन होते ज्यामुळे केस गळू लागतात.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. तुम्हाला ही कमतरता 65 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये जास्त आढळेल. जास्त व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फॅटी फिश, धान्य, अंडी, ब्रेड, कॉड लिव्हर ऑइल, दही आणि मशरूम यांचा समावेश करू शकता.

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे तुमचे केस कोरडे आणि निर्जीव होतात. डॉक्टरांच्या अहवालानुसार, व्हिटॅमिन ई सप्लिमेंट्स घेत असणाऱ्या लोकांच्या केसांच्या वाढीत 34.5% वाढ झाली. सूर्यफुलाच्या बिया, पालक, एवोकॅडो आणि बदामांमध्येही तुम्हाला व्हिटॅमिन ई मिळेल.

बायोटिन

बायोटिन, ज्याला व्हिटॅमिन बी7 म्हणतात, केराटिनचे उत्पादन वाढवत असल्याने तुमचे केस गुळगुळीत आणि रेशमी बनतात. केसांमध्ये त्याची कमतरता असणे सामान्य आहे. अंडी, शेंगदाणे, मांस, मासे, रताळे आणि बिया यासह अनेक खाद्यपदार्थांमध्ये हे जीवनसत्व आढळू शकते.

Leave a Comment