Hair fall । अनेकांना केसगळतीचा सामना करावा लागतो. अनेकांना काळे आणि घनदाट केस आवडतात. जर तुमचे केस पातळ झाली असतील तर तुम्ही आता काही ऑइल वापरू शकता, ज्याचा तुम्हाला काही दिवसात परिणाम पाहायला मिळेल.
जोजोबा तेल
जोजोबा तेल केसांसाठी खूप चांगले असून हे केस मजबूत करते. तसेच केसांना खोल पोषण देते आणि नुकसान होण्यापासून संरक्षण करते. आठवड्यातून दोनदा केसांना जोजोबा तेल लावले तर केसांची वाढ जलद होते. विशेष म्हणजे जोजोबा तेलात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे केसांची वाढ होते.
ऑलिव तेल
ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई, अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओलिक ॲसिड असल्याने केस मजबूत होतात. यामुळे केसांना मुळापासून पोषण मिळते. तसेच त्यांची वाढ होण्यास मदत होते. आंघोळीच्या दोन तास पूर्वी केसांना ऑलिव्ह ऑईल लावून नंतर शॅम्पू करा. याने केस लवकर वाढतात.
खोबरेल तेल
केसांसाठी खोबरेल तेल हे एक उत्तम प्रकारचे तेल आहे जे शतकानुशतके चालू आहे. खोबरेल तेलात अनेक जीवनसत्त्वे असतात. खोबरेल तेलाने केसांना मसाज केली तर आपल्या केसांची वाढ वाढते. या तेलात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. हे स्कॅल्पमधील बॅक्टेरिया किंवा फंगसची समस्या दूर करून केस तुटण्यास प्रतिबंध करते. यात फॅटी ॲसिड आढळते जे केसांना पोषण देते आणि केसांना चमक देते.
एरंडेल तेल
एरंडेल तेलामध्ये खरंतर व्हिटॅमिन ई, प्रथिने आणि खनिजे आढळतात. इतकेच नाही तर या तेलामध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत जे केसांना कोंडा आणि टाळूच्या समस्यांपासून वाचवतात. एरंडेल तेल टाळूत रक्त परिसंचरण सुधारते आणि केसांना आर्द्रता देते.