Hair Care : अशा प्रकारे वापरा मोहरीचे तेल, केसांच्या गळतीला लागेल ब्रेक

Hair Care : हल्ली अनेकांना केसगळतीचा सामना करावा लागत आहे. अनेक उपाय करूनही अनेकांना या समस्येपासून मुक्तता मिळत नाही. पण तुम्ही एक उपाय केला तर तुम्हाला त्याचा लगेच परिणाम पाहायला मिळेल.

नारळाचे तेल तेल लावण्यासाठी सर्वात जास्त वापरले जात असले तरी तुम्ही बदाम आणि मोहरीचे तेल वापरू शकता. मोहरीचे तेल केसांसाठी गरजेचे आहे. हे तेल लावल्याने केस मजबूत होतात आणि कोंड्याची समस्या देखील दूर होते.

मोहरीच्या तेलात असतात पोषक तत्वे

मोहरीच्या तेलात जीवनसत्त्वे, कॅल्शियम, ओमेगा-३ आणि ६ फॅटी ॲसिडसह अँटिऑक्सिडंट्स असतात. या तेलामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने टाळूच्या संसर्गापासून बचाव होतो. एवढेच नाही तर या तेलाचा नियमित वापर केसांच्या वाढीवरही होतो. टाळूसह केसांचा कोरडेपणाही दूर होतो.

अशा प्रकारे वापरा मोहरीचे तेल

मोहरीचे तेल + कढीपत्ता

 • केसांच्या लांबीनुसार कढीपत्ता घ्या.
 • एका लोखंडी कढईत किंवा इतर कोणत्याही भांड्यात मोहरीचे तेल गरम करून घ्या.
 • या गरम तेलात कढीपत्ता टाकून गॅस बंद करा.
 • ही पाने २ ते ३ दिवस तेलात अशीच राहू द्या.
 • त्या नंतर हे केसांना लावा.
 • हे तेल लावले तर केसांची ताकद वाढते.
 • कढीपत्त्यात असणारे अँटीबॅक्टेरियल घटक टाळूचे संक्रमण दूर करतात आणि केस गळणे थांबवतात.

आवळा पावडर + मोहरीचे तेल

 • मोहरीचे तेल १ कप गरम ठेवा.
 • हे तेल नंतर थंड होऊ द्या. यानंतर त्यात साधारण १ चमचा आवळा पावडर टाका.
 • आता हे तेल केसांच्या मुळांना लावून 30 ते 45 मिनिटे ठेवून ते नंतर धुवून टाका.
 • आवळा पावडर उपलब्ध नसेल तर त्याऐवजी आवळा रस वापरू शकता.

Leave a Comment