Hair Care Tips : वाढत्या वयाबरोबर केसही पांढरे होऊ लागतात. अनेक वेळा लहान वयातही केस पांढरे होतात. ज्याचे कारण खराब जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, प्रदूषण इत्यादी असू शकते. आजकाल केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे. केस आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालतात पण, पांढरे केस आपले सौंदर्य कमी करतात. त्यामुळे अनेकदा लोक केस काळे करण्यासाठी रंग लावतात. रंगात अनेक प्रकारची रसायने आढळतात. उदाहरणार्थ अमोनियामुळे केस अधिक पांढरे होतात, परंतु तुम्ही घरी काही नैसर्गिक पद्धतीने केसांना कलर करू शकता यामुळे तुमचे केस खराब होणार नाहीत.
ब्लॅक टी
ब्युटी प्रोडक्ट म्हणूनही चहाचा वापर केला जातो. केसांना रंग देण्यासाठीही चहा उपयुक्त आहे. केस काळे करण्यासाठी चहा पावडर एक ग्लास पाण्यात उकळून गाळून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर केसांना लावा आणि सुमारे 1 तासानंतर केस धुऊन टाका.
कॉफी
केस काळे करण्यासाठीही कॉफीचा वापर केला जाऊ शकतो. एक ग्लास पाण्यात टाकून भरपूर कॉफी उकळा आणि थंड झाल्यावर केसांना लावा. साधारण १ तासानंतर केस धुऊन टाका.
आवळा
आवळा आणि मेंदीच्या वापराने पांढरे केस काळे करता येतात. यासाठी एका भांड्यात २ चमचे आवळा पावडर घ्या, त्यात २ चमचे मेंदी पावडर मिसळा आणि पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट केसांना लावा आणि 1 तास ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका.
कलोंजी
केसांना कलर करण्यासाठीही कलोंजी उपयुक्त आहे. 1 चमचा कलोंजी आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑईल मिक्स करा. ते मिक्स करून केसांच्या मुळांना मसाज करा. असे तीन महिने आठवड्यातून एकदा केल्यास तुम्हाला फरक दिसेल.
टीप – लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.