Hair Care : कोरड्या आणि निर्जीव केसांमुळे हैराण झालात? ‘या’ सोप्या पद्धतीने मिळवा उपाय

Hair Care : अनेकांना आपले केस लांब, काळे असावेत असे वाटते. पण अनेकांना केसगळतीचा सामना करावा लागतो. जर तुम्हीही कोरड्या आणि निर्जीव केसांमुळे हैराण असाल तर काळजी करू नका. तुम्ही यावर देखील मात मिळवू शकता.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महागडी आणि हानिकारक उत्पादने न वापरता तुम्हाला तुमचे केस नैसर्गिकरित्या वाढवता येतील. अशाच काही टिप्स आहेत, ज्याचे तुम्ही नियमितपणे पालन केले तर तुमची केसगळतीची समस्या काही वेळेत कमी होईल.

कोणत्या केस पाण्याने कसे धुवावीत?

हे लक्षात घ्या की केस कधीही खूप गरम पाण्याने धुवू नयेत. कारण तुम्ही गरम पाण्याने केस धुतले तर केसांचे नुकसान होते, त्यामुळे तुमचे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. असे असल्याने आपले केस नेहमी कोमट पाण्याने धुवावेत. इतकेच नाही तर केस धुतल्यानंतर त्यावर कंडिशनर लावा. यामुळे केसांना चमक येईल.

किती वेळा केस धुणे गरजेचे आहे?

समजा जर तुम्हाला तुमचे केस निरोगी ठेवायचे असल्यास तर तुम्हाला आठवड्यातून किमान तीन वेळा केस धुवावे लागणार आहेत. तसेच केस धुतल्यानंतर कंडिशनर देखील लावणे तितकेच महत्त्वाचे आहे. समजा तुमची टाळू कोरडी असेल तर आठवड्यातून किमान दोनवेळा केस धुणे गरजेचे आहे. ज्यांच्या केसांमध्ये तेल किंवा मॉइश्चरायझर आहे त्यांनी आठवड्यातून किमान तीन वेळा केस धुणे गरजेचे आहे. यामुळे तुमचे केस स्वच्छ आणि निरोगी राहू शकतात.

केस ट्रिम करावेत का?

नैसर्गिकरित्या केस वाढवण्यासाठी, तुम्ही केसांची योग्य ती काळजी घ्यावी. हे लक्षात घ्या की कुरळे केसांना जास्त ओलावा लागतो. तर सरळ केसांना कंडिशनरची गरज पडते. यासाठी वेळोवेळी केस ट्रिम करा. कारण तुम्ही असे केले तर तुमचे निर्जीव आणि फाटलेले केस काढून टाकतील, ज्यामुळे केसांची वाढ देखील चांगली होईल.

केसांची साधने

आजकाल केसांच्या वाढीसाठी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध असून ती उत्पादने आंधळेपणाने वापरू नका, कारण अनेक वेळा ती उत्पादने केसांना गरजेचे असलेले सर्व पोषक घटक पुरवत नाहीत. तसेच कर्लिंग आयर्न, ब्लो ड्रायर आणि स्ट्रेटनर यांचाही जास्त वापर टाळावा. यामुळे केसांचे नुकसान होऊन त्यांची वाढ थांबते.

Leave a Comment