Gujarat Elections : भारतीय जनता पक्षाला (BJP) गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Elections) आपला विजयी सिलसिला कायम ठेवायचा आहे. त्यासाठी संघाने टप्प्याटप्प्याने आराखडा तयार केला आहे. पक्षाने जिल्हानिहाय व जागानिहाय नेत्यांवर जबाबदारी सोपविल्याचे वृत्त आहे. भाजप प्रचारासाठी अनेक राज्यांचे बडे मंत्रीही गुजरातमध्ये जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारत निवडणूक आयोगाने अद्याप विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.

182 जागा असलेले गुजरात (Gujarat) उत्तर, पश्चिम, मध्य विभाग आणि सौराष्ट्र अशा 4 भागात विभागले गेले आहे. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, राज्यमंत्री, आमदार, माजी आमदार आणि आरएसएसशी संबंधित लोकांना प्रदेश आणि जिल्हावार जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या नेत्यांकडे अनुक्रमे सौराष्ट्र, पश्चिम, उत्तर आणि मध्य प्रदेशांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्र्यांना काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जागांची जबाबदारी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतंत्र देव सिंह यांना अंबासा, मांडवी, भुज, अंजार, गांधीधाम देण्यात आले आहेत. राज्यसभा खासदार लक्ष्मीकांद बाजपेयी यांना जुनागड प्रदेशाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जुनागड, विश्वधर, मंगरूळ, मानवदरमध्ये काँग्रेसने (Congress) बाजी मारली होती. तर भाजपला केवळ केशोदची जागा जिंकता आली.

खासदार नेत्यांना मध्यवर्ती भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन खासदार नेत्यांना प्रत्येकी दोन जागा देण्यात आल्या आहेत. मध्य गुजरातमध्ये 7 जिल्हे असून 37 जागांवर भाजपकडे आहेत. यामध्ये दाहोद, महिसागर, मेहसाणा आणि बडोदा शहरी जागांच्या नावांचा समावेश आहे. मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) गृहमंत्री नरोत्तम मिश्रा बनासकांठाच्या कामावर देखरेख करणार आहेत. त्यांच्याशिवाय अरविंद सिंग भदौरिया यांच्याकडे भरूचची तर इंदर सिंग परमार यांच्याकडे खेडाची जबाबदारी आहे.

गुजरातच्या उत्तरेकडील भागात, राजस्थानमधून स्थलांतरितांची संख्या खूप जास्त आहे. आकडेवारी दर्शवते की राज्यातील 18 ते 20 टक्के मतदार हे राजस्थानमधील स्थलांतरित आहेत. अशा स्थितीत भाजपने राजस्थानमधील सुशील कटारा यांच्यासह काही नेत्यांकडे परिसराची जबाबदारी सोपवली आहे. महिसागर जिल्ह्यातील बालासिनोर, संतरामपूर या जागांची जबाबदारी राज्यमंत्री जेपीएस राठोड यांच्याकडे असेल. गेल्या निवडणुकीत संतरामपूरच्या जागेवर भाजपला यश मिळाले. तर बालसिनोरची जागा काँग्रेसने जिंकली. लुनवाडा जागा अपक्ष उमेदवाराच्या खात्यात आली. राज्यमंत्री दयाशंकर सिंह राजकोट जिल्ह्याची जबाबदारी पाहतील.

राज्यात गेल्या 24 वर्षांपासून भाजप सरकार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 12 वर्षांहून अधिक काळ राज्याचे मुख्यमंत्री होते. केशुभाई पटेल (Keshubhai Patel) यांनीही त्यांच्या आधी हे पद भूषवले होते. मोदींनंतर विजय रुपाणी हेही मुख्यमंत्री होते आणि सध्या भूपेंद्र पटेल (CM Bhupendra Patel) राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे यावेळच्या निवडणुकीत Arvind Kejriwal यांच्या आम आदमी पक्षालाही (AAP In Gujarat Election) बळ मिळत आहे, त्यामुळे ही लढत तिरंगी होणार असल्याचे दिसत आहे.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की राज्यात मुख्य लढत अजूनही भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version