Gujarat Electons : नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने गुजरात निवडणुकीच्या (Gujarat Elections) तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत. मात्र, राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गुजरातमधील राजकारणात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गुजरातमध्ये सत्ता मिळवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आम आदमी पार्टीने येथेही पंजाबप्रमाणेच राजकारण सुरू केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) हे तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर (Gujarat) आहेत. त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत जनतेला काय वाटते, कोण मुख्यमंत्री व्हावा, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडीही जारी केला आहे. ज्यावर नागरिक 3 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माहिती देऊ शकतात.
भगवंत मान आणि गुजरातचे प्रमुख गोपाल इटालिया यांच्यासोबत अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचे (AAP) सरकार स्थापन होणार आहे. अशा परिस्थितीत आपण कोणाला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करायचा हे जनता ठरवेल. ते म्हणाले की, आम्ही पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी ज्या पद्धतीने प्रचार केला होता आणि लोकांनी भगवंत मान यांना निवडले होते. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये आम्ही प्रचार सुरू करत आहोत. मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेने 3 नोव्हेंबरपर्यंत सांगावे. 4 नोव्हेंबर रोजी जनमत जाहीर केले जाईल.
केजरीवाल म्हणाले की, वर्षभरापूर्वी भाजपने (BJP) आपला मुख्यमंत्री बदलला. ते जनतेला विचारत नाहीत. आपण लोकशाहीत राहतो. ज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते. तुम्हाला मुख्यमंत्री कोण करायचे आहे हे जनतेला विचारून आम्ही ठरवू. आता संपूर्ण गुजरातमध्ये आप सरकार येणार असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘आप’ सरकार आले तर जो आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल तो गुजरातचा पुढील मुख्यमंत्री होईल. आज आम्ही जनतेला विचारू इच्छितो की राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असावा. यासाठी आम्ही मोबाइल क्रमांक जारी करत आहोत. यावर एसएमएस, व्हॉट्सअॅप किंवा व्हॉइस मेसेज पाठवू शकता. आम्ही एक मेल आयडी जारी करत आहोत.
गुजरातमध्ये परिवर्तनाचे वादळ सुरू आहे. भाजपने 27 वर्षे राज्य केले. 27 वर्षांनंतर, त्यांच्याकडे मोजण्यासाठी एकही काम नाही. त्यांचा संपूर्ण प्रचार ‘आप’ वर टीका देण्यावर केंद्रित आहे. त्यांचे मोठे नेते, मंत्री फक्त आप आणि केजरीवाल यांच्यावर टीका करतात. त्यांनी 27 वर्षात काय काम केले, हे आम्ही त्यांना वारंवार विचारतो, त्यांच्याकडे सांगण्यासारखं काम नाही. त्यांच्याकडे पुढील 5 वर्षांचा कोणताही अजेंडा नाही.
- Read : Gujarat Election : अर्र.. ‘त्या’ 60 जागा भाजपला ठरणार डोकेदुखी; पहा, गृहमंत्र्यांचा काय आहे प्लान ?
- Gujarat Elections 2022 : मोदींच्या गुजरातमध्ये भाजपला झटका; काँग्रेस-‘आप’ला रोखण्यासाठी केला ‘हा’ फॉर्म्यूला..
- Gujarat Elections : निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने केला ‘हा’ मोठा प्लान; पहा, काँग्रेस-आपला कशी देणार टक्कर ?