Gujarat Election : नवी दिल्ली : गुजरातमध्ये पुढील सरकार कोणाचे असेल, या प्रश्नाचे उत्तर द्यायला फारसा वेळ उरलेला नाही. 8 डिसेंबरला हे ठरेल. मात्र, त्याआधीच राजकीय पक्षांकडून मतदानाबाबत जोरदार प्रचार सुरू आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेसपासून ते आम आदमी पक्षापर्यंत सर्व पक्ष आपापल्या विजयासाठी काम करत आहेत. एवढेच नाही तर उमेदवारांनीही निवडणुकीसाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. यावेळी गुजरात निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे.
निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यधीश उमेदवारांचाही समावेश आहे. यावेळी एक-दोन नव्हे तर तब्बल 200 करोडपती उमेदवार निवडणूक लढत आहेत. यावेळच्या निवडणुकीत किती कोट्यधीश उमेदवार आहेत आणि पहिल्या टप्प्यातील स्थिती काय आहे ते जाणून घेऊ या.
पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 788 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये एकूण 211 उमेदवार करोडपती असून एकूण मतदारांपैकी त्यांची टक्केवारी 27 टक्के आहे. 2017 च्या निवडणुकीत 198 करोडपती उमेदवार होते.
यावेळी गुजरात विधानसभा निवडणुकीत करोडपती उमेदवारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यावेळी एकूण लक्षाधीश उमेदवारांपैकी 5 कोटींहून अधिक संपत्ती असलेले एकूण ७३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्याचबरोबर दोन कोटींहून अधिक संपत्ती असलेले 77 उमेदवार रिंगणात आहेत. जे गेल्या निवडणुकीपेक्षा 10 टक्के जास्त आहे. तसेच 50 लाख ते 2 कोटीपर्यंत संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्याही 125 असून, त्यात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, 10 लाखांपेक्षा कमी मालमत्ता असलेल्या उमेदवारांची संख्या 343 आहे. त्यातही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 43 टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच यावेळी निवडणुकीत मातब्बर उमेदवार बाजी मारत आहेत.
गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याबद्दल बोलायचे झाले तर या टप्प्यातही मोठ्या संख्येने करोडपती उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. संपत्तीचा विचार करता भाजपने पहिल्या टप्प्यात 89 जागांवर सर्वाधिक 79 करोडपतींना तिकीट दिले आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून, 65 करोडपती उमेदवार निवडणूक लढत आहेत, तर आम आदमी पक्षाकडे 88 उमेदवारांपैकी 33 करोडपती उमेदवार आहेत. गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची सरासरी संपत्ती 2.88 कोटी रुपये आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या आकडेवारीत वाढ झाली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 923 उमेदवारांची सरासरी मालमत्ता 2.16 कोटी रुपये होती.
- Must Read : Gujarat Election : .. म्हणून काँग्रेस गुजरातमध्ये ‘आम आदमी’ला रोखणार; पहा, काय आहे खास प्लान
- भाजपपुढील संकटात वाढ..! ‘त्या’साठी गृहमंत्री शहा थेट गुजरातेत; पहा, Gujarat Election मध्ये काय घडतेय ?