Gujarat Election Result Live Update : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. गुजरातमध्ये भाजपने ट्रेंडमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. मात्र हिमाचलमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. येथे काँग्रेस भाजपला जोरदार टक्कर देत आहे. हे अंदाज प्राथमिक आकडेवारीचे आहेत. भाजपशासित गुजरातमधील 33 जिल्ह्यांतील विधानसभेच्या 182 जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. गुजरातमध्ये परंपरागतपणे भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होत आहे. मात्र, यावेळी आम आदमी पक्षाचा (आप) रिंगणात प्रवेश झाल्याने राज्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. गुजरातमध्ये यावर्षी 66.31 टक्के मतदान झाले, जे 2017 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या 71.28 टक्के मतदानापेक्षा कमी आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी, युवा नेते हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांच्यासह एकूण 1,621 उमेदवारांच्या भवितव्याचा आज निर्णय होणार आहे. गुजरात निवडणुकीत एकूण 70 राजकीय पक्ष आणि 624 अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे.
गुजरातमधील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पार्टी 3 जागांवर आघाडीवर आहे. तर पक्षाचे नेते गोपाल इटालिया त्यांच्या जागेवर पिछाडीवर आहेत. गुजरातमध्ये इतर पक्षांची 4 जागांवर आघाडी आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. मात्र, देवभूमीत काँग्रेस कडवी झुंज देत असून पक्ष काही जागांवर पिछाडीवर आहे. पण गुजरातच्या ट्रेंडमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. गुजरातमधील विजयी आमदारांना आज जयपूरला हलवण्यात येणार असल्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. गुजरातच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. काँग्रेस खूप मागे आहे.
हिमाचल प्रदेशच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप आणि काँग्रेसची जोरदार लढत आहे. ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. मात्र काँग्रेसच्या तुलनेत त्यांची आघाडी काही जागांची आहे. हे सुरुवातीचे ट्रेंड आहेत. हिमाचलमध्ये काँग्रेसला पलटवार करता येईल का, हे पाहावे लागेल. गुजरातमध्ये सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. पक्षाला 100 हून अधिक जागांवर आघाडी दिसत आहे. तथापि, हे सुरुवातीचे ट्रेंड आहेत. दुसरीकडे, काँग्रेसकडे 30 हून अधिक जागांवर आघाडी आहे. मात्र आम आदमी पक्षाचे खाते अद्याप उघडलेले नाही. जामनगरमध्ये भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पक्षाने ना गुजरातमध्ये खाते उघडले आहे ना हिमाचल प्रदेशात.
- वाचा : Himachal Election Result Live Update : सुरुवातीलाच भाजपला मोठी आघाडी; आप-काँग्रेसचे वाढले टेन्शन
- BJP Mission 2024 : ‘या’ राज्यात भाजप करणार मोठा उलटफेर.. ‘येथे’ सुरू होणार मिशन 2024