Gujarat Election : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ते 22 नोव्हेंबर असे सलग तीन दिवस गुजरातमधील सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान सौराष्ट्रात तीन सभा घेणार आहेत. 21 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या दोन सभा आहेत. यातील एक रॅली सौराष्ट्र भागात तर एक दक्षिण गुजरात भागात होणार आहे. तसेच 22 नोव्हेंबरला सौराष्ट्रात दोन रॅली होतील. रॅलींना संबोधित करण्यासोबतच पंतप्रधानांचा रोड शोही होणार आहे.
गुजरात हे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य आहे. मागील 27 वर्षांपासून भाजप येथे सत्तेत आहे. त्यामुळे यंदाही सत्ता टिकवायचीच या हेतून भाजप प्रयत्न करत आहे. यावेळी भाजपला काँग्रेसबरोबरच आम आदमी पार्टीचेही आव्हान आहे. राज्यात आप जोरदार टक्कर देण्याच्या स्थितीत नसला तरी अनेक ठिकाणी डोकेदुखी ठरू शकतो. त्यामुळे भाजपने त्यानुसार नियोजन केले आहे. काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांचा विचार करून रणनिती तयार केली जात आहे. यावेळी भाजपला निवडणूक आव्हानात्मक राहणार आहे. कारण, मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. या निवडणुकीत भाजपला फक्त 99 जागा जिंकता आल्या. त्यामुळे यंदा अशी परिस्थिती होऊ नये, तसेच सत्ताविरोधी वातावरणाचाही फटका बसू नये, याची काळजी नेते घेताना दिसत आहे.
यंदाही पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्यावर भिस्त आहे. प्रचाराची रणनिती तयार करण्यात आली आहे. स्टार प्रचारकांची जी यादी तयार केली आहे. त्या या पहिल्या यादीत हिमाचल प्रदेशातीव पक्षाचे दिग्गज नेते गायब आहेत. राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अन्य नेते प्रचारात दिसत नाही. तर ज्येष्ठ नेते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
- Read : Gujarat Election मध्ये भाजपने घेतला मोठा निर्णय; प्रचारातून ‘हे’ दिग्गज नेते गायब; जाणून घ्या..
- Congress : Uttar Pradesh साठी काँग्रेस लवकरच घेणार ‘हा’ निर्णय; भाजपला देणार जोरदार टक्कर