Gujarat Election: गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुक तारखा जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनीही प्रचारास सुरुवात केली आहे. अशावेळी काही गावांनी आपल्या हक्कासाठी जागरूकता दाखवली आहे. नवसारी विधानसभेतील 18 गावांतील जनतेने तर, सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांची चिंता वाढवली आहे. या ग्रामस्थांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर सत्ताधारी भाजपसह अन्य पक्षांच्या नेत्यांना गावात येण्यावर आणि गावात प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
अमर उजाला यांनी बातमीत म्हटले आहे की, येथील अंचेली रेल्वे स्थानकावर (Ancheli railway station) लोकल गाड्यांना थांबा देण्याची ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. मात्र त्यांची मागणी कोणत्याही सरकारने अजूनही मान्य केली नाही. यामुळे त्यांनी संताप व्यक्त करून अंचेली रेल्वे स्थानक व इतर स्थानकांवर ग्रामस्थांच्या वतीने बॅनरही लावण्यात आले आहेत. त्यांच्यावर ‘नो ट्रेन, नो व्होट’ (No train, then no vote) असे स्पष्ट लिहिले आहे.
येथील रेल्वे स्थानकावर गाडी न थांबल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे परिसराची सामाजिक व आर्थिक उन्नती थांबली आहे. येथून एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किमान 300 रुपये खर्च करावे लागतात. गावातील गरिबांना हे परवडत नाही. तसेच गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभ्यासात अडचणी येत असल्याचे ते सांगतात. अनेकदा त्यांना कॉलेजला जायला उशीर होतो, त्यामुळे लेक्चरही चुकतात.
एका स्थानिक रहिवाशाचे म्हणणे आहे की 1966 पासून अंचेली रेल्वे स्थानकावर गाड्या थांबत होत्या. पूर्वी पॅसेंजर ट्रेन येथे थांबत असे आणि नंतर त्यांची संख्या वाढली. मात्र, कोरोना महामारीच्या (Corona epidemic) वेळी या स्थानकावर गाड्या थांबल्या नाहीत. आता सर्वकाही सामान्य झाले असतानाही येथे गाड्या थांबत नाहीत. आताही येथे गाडी अधिकृतपणे थांबली नाही तर मतदानाच्या दिवशी कोणीही मतदानाला जाणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ICC T20 World Cup 2022: इंग्लंडनेही गमावल्या 3 विकेट; बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रुकची उत्तम खेळी
Narendra Modi Rojgar melava: महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा!