Gujarat Election : नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर आता नेते गुजरातकडे वळू लागले आहेत. भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. मात्र भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशिवाय हिमाचलमधून दुसरे कोणाचेही नाव नाही. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि युवा नेते अनुराग ठाकूर यांचेही स्टार प्रचारकांच्या पहिल्या यादीत नाव नाही. भाजपने 40 नेत्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण हिमाचल भाजपमधील कोणताही मोठा चेहरा यामध्ये सहभागी नाही. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा आणि इतर बडे नेते आहेत.
गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांचे निकाल 8 डिसेंबरला एकाच वेळी जाहीर होणार आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान झाले आहे. आता निकालाची प्रतीक्षा आहे. हिमाचलमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले आहे. तर गुजरातमध्ये दोन टप्प्यात 182 जागांसाठी मतदान होणार आहे.
मात्र, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी जाऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. हिमाचलमधील पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की जयराम ठाकूर 25 नोव्हेंबरला निवडणूक प्रचारासाठी गुजरातला जाऊ शकतात. या माहितीची अद्याप खात्री झालेली नाही. गुजरात निवडणुकीत प्रचार जोरात सुरू आहे. यंदा फक्त काँग्रेस आणि भाजप नाही तर आम आदमी पार्टी सुद्धा मैदानात आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. आम आदम पार्टीनेही प्रचार सुरू केला आहे. याआधी नगरपालिकांच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे पक्षातील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
- हे सुद्धा वाचा : भाजपपुढील संकटात वाढ..! ‘त्या’साठी गृहमंत्री शहा थेट गुजरातेत; पहा, Gujarat Election मध्ये काय घडतेय ?
- अरे वा.. Gujarat Election मध्ये मतदार आक्रमक; ‘त्या’ मुद्द्यावर भाजपला केली गावबंदी..!