Gratuity Limit : आनंदाची बातमी! ‘या’ लोकांना भरावा लागणार नाही 25 लाखांवर कर

Gratuity Limit : केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना 25 लाखांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा त्याचा उद्देश असून समजा एखाद्या कर्मचाऱ्याने निवृत्तीनंतर किंवा शारीरिक अपंगत्वामुळे कंपनी किंवा संस्थेत काम करणे थांबवले तर त्याला अटींसह ग्रॅच्युइटी देण्यात येते हे लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ग्रॅच्युइटी फक्त अशा कोणत्याही कर्मचाऱ्यालाच मिळते ज्याने नोकरीमध्ये सुमारे 5 वर्षे सतत काम केले आहे.

ग्रॅच्युइटीची गणना

लोकांना त्यांची ग्रॅच्युइटी माहीत नसते पण त्याची गणना खूप सोपी असते. 5 वर्षांच्या सेवेनंतर, सेवेत पूर्ण झालेल्या प्रत्येक वर्षासाठी, मागील महिन्याचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता जोडण्यात येतो. सर्वात अगोदर 15 ने गुणाकार केला जातो. यानंतर ते सेवेतील वर्षांच्या संख्येने भागून यानंतर मिळालेल्या रकमेला 26 ने भागले जाते. कमावलेली रक्कम ही तुमची ग्रॅच्युइटी असते.

महागाई भत्त्यात ४% वाढ

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यासही मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार असून ते मार्चअखेर पगारासह जमा करण्यात येईल. यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाईल. सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली असून महागाई भत्त्यात वाढ झाली असल्याने सरकारी तिजोरीवर 12,868.72 रुपयांचा ताण येईल.

पण, त्यानंतर महागाई भत्ता शून्यावर येईल. यानंतर 0 पासून महागाई भत्त्याची गणना सुरू होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ५० टक्के डीए जोडण्यात येईल. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा त्याच्या पे बँडनुसार किमान मूळ वेतन 18000 रुपये असल्यास त्याच्या पगारात 9000 रुपयांच्या 50 टक्के रक्कम जोडण्यात येईल.

Leave a Comment