Grand Vitara Discount : तुम्ही आता लाखो रुपयांची सवलत मिळवून SUV खरेदी करू शकता. तुम्हाला 28km मायलेज असणारी कार तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल.
मिळेल 1.28 लाख रुपयांची सवलत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑगस्ट महिन्यात ग्रँड विटारा हायब्रीडवर 1.28 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळेल. 63,100 रुपयांची सवलत त्याच्या हायब्रिड मॉडेलवर आणि CNG मॉडेलवर 33,100 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. पण हे लक्षात ठेवा, ही सवलत फक्त स्टॉक सपेपर्यंत आहे.
किंमत आणि फीचर्स
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ग्रँड विटाराची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख ते 19.93 लाख रुपये आहे. ग्रँड विटारा 26 सप्टेंबर 2022 रोजी देशात लॉन्च झाली होती. त्यात बसवलेले हायब्रीड तंत्रज्ञान हा त्याचा प्लस पॉइंट आहे. हे 1462 cc आणि 1490 cc च्या दोन इंजिन पर्यायांमध्ये येईल जे 102bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क प्रदान करते. कारचे इंजिन 20.58 आणि 27.97 kmpl पर्यंत मायलेज देतात.
मिळेल 6-एअरबॅग
सुरक्षिततेसाठी, मारुती ग्रँड विटारामध्ये 6-एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल होल्ड असिस्ट, स्पीड अलर्ट, पार्किंग सेन्सर आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी फीचर्स आहेत. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान यासारखी मानक फीचर्स मिळतील. यात 5 जण प्रवास करू शकतात. ग्रँड विटाराच्या विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास या वर्षी जूनमध्ये या कारचे एकूण 9,679 युनिट्स विकले गेले.
कंपनीने सांगितले की, केवळ 23 महिन्यांत ग्रँड विटाराच्या 2 लाखांपेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली असून कंपनीच्या मतानुसार, ती आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात वेगाने विकली जाणारी एसयूव्ही आहे. विशेष म्हणजे लॉन्च झाल्यानंतर 10 महिन्यांत ग्रँड विटाराच्या एक लाख युनिट्सची विक्री झाली.
विक्रीच्या बाबत बोलायचे झाले तर या एसयूव्हीने क्रेटा आणि सेल्टोसला मागे टाकले आहे.