अहमदनगर : नगर तालुक्यातील कर्जुने खारे येथे कार्यरत असणाऱ्या ग्रामसेविका प्रियंका भोर यांना राजर्षी शाहू प्रतिष्ठान व दक्ष पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय *राजर्षी शाहू ग्रामरत्न* पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि. 14 नोव्हेंबर रोजी शिरुर, जि. पुणे येथील नगरपालिका मंगल कार्यालयात होणार आहे.
सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री मा. ना. अतुल सावे ह्यांच्या अध्यक्षतेखाली, श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी विधानसभा अध्यक्ष, आ. दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री संजय भेगडे, प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल आदींसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी पणे अंमलबजावणी करून आदर्शवत काम करणार्या लोकप्रतिनिधी व लोकसेवकांचा पुरस्कार देऊन सन्मान करणे हे सामाजिक दायित्व आहे. तर आपली कर्तव्ये बजाविण्यात कसूर करणार्यांना लगाम घालण्यासाठी राजर्षी शाहू प्रतिष्ठान व दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून काम सुरू आहे. त्याच भावनेतून ‘या पुरस्कार सोहोळ्याचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भगवान श्रीमंदीलकर यांनी दिली.
श्रीमती प्रियंका भोर यांनी कर्जुने खारे येथे आदिवासी समुदायातील नागरिकांना हक्काचा पक्का निवारा मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा
शेवटच्या घटकांपर्यंत योग्य पद्धतीने लाभ मिळावा यासाठी प्रभावी अंमलबजावणी केली. ‘शबरी नगर गृह संकुल’ प्रकल्पाची राज्य शासनाने देखील दखल घेतली असून महाआवास अभियान 2020-21 अंतर्गत त्यास प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. त्यामुळे श्रीमती भोर यांची पुरस्कारासाठी निवड झाली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भगवान श्रीमंदीलकर यांनी दिली.
Trending
- Sim Card Rules: मोठी बातमी! आता ‘या’ लोकांना मिळणार नाही नवीन सिम ; जाणुन घ्या कारण
- Aadhaar Card: सावधान! चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड बनवणाऱ्यांवर होणार ‘ही’मोठी कारवाई; सरकारने दिली माहिती
- Maharashtra IMD Alert & Weather Forecast: शेतकऱ्यांनो तयारीत रहा; ‘त्या’ दिवशी होणार आहे अवकळी पाऊस
- WhatsApp New Features: भारीच.. आता व्हाट्सअप फोटोंमधून टेक्स्ट होणार कॉपी! जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट
- आनंदाची बातमी! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे OnePlus चा नंबर 1 5G स्मार्टफोन; पहा ऑफर
- Assembly Election: ‘या’ राज्यात काँग्रेस देणार भाजपाला टक्कर! राहुल गांधी आज करणार सुरूवात
- IMD Rainfall Alert : अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस! तर ‘या’ राज्यात पुन्हा होणार गारांचा पाऊस
- Rahul Gandhi : ‘मी असं काही बोललो नाही…’, राहुल गांधींनी दिलं ‘त्या’ प्रकरणात स्पष्टीकरण ! अनेक चर्चांना उधाण