अहमदनगर : नगर तालुक्यातील कर्जुने खारे येथे कार्यरत असणाऱ्या ग्रामसेविका प्रियंका भोर यांना राजर्षी शाहू प्रतिष्ठान व दक्ष पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय *राजर्षी शाहू ग्रामरत्न* पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि. 14 नोव्हेंबर रोजी शिरुर, जि. पुणे येथील नगरपालिका मंगल कार्यालयात होणार आहे.
सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री मा. ना. अतुल सावे ह्यांच्या अध्यक्षतेखाली, श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी विधानसभा अध्यक्ष, आ. दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री संजय भेगडे, प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल आदींसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी पणे अंमलबजावणी करून आदर्शवत काम करणार्या लोकप्रतिनिधी व लोकसेवकांचा पुरस्कार देऊन सन्मान करणे हे सामाजिक दायित्व आहे. तर आपली कर्तव्ये बजाविण्यात कसूर करणार्यांना लगाम घालण्यासाठी राजर्षी शाहू प्रतिष्ठान व दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून काम सुरू आहे. त्याच भावनेतून ‘या पुरस्कार सोहोळ्याचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भगवान श्रीमंदीलकर यांनी दिली.
श्रीमती प्रियंका भोर यांनी कर्जुने खारे येथे आदिवासी समुदायातील नागरिकांना हक्काचा पक्का निवारा मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा
शेवटच्या घटकांपर्यंत योग्य पद्धतीने लाभ मिळावा यासाठी प्रभावी अंमलबजावणी केली. ‘शबरी नगर गृह संकुल’ प्रकल्पाची राज्य शासनाने देखील दखल घेतली असून महाआवास अभियान 2020-21 अंतर्गत त्यास प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. त्यामुळे श्रीमती भोर यांची पुरस्कारासाठी निवड झाली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भगवान श्रीमंदीलकर यांनी दिली.
Trending
- Mumbai News : धक्कादायक! बापानेच केली 10 वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या; कारण जाणुन वाटेल आश्चर्य
- Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना धक्का! ‘त्या’ प्रकरणात साखर कारखान्याची कोट्यवधींची मालमत्ता जप्त
- Pune Accident : भीषण अपघात! भरधाव कारने 5 मजुरांना चिरडले; 2 मजुरांचा जागीच मृत्यू
- Maharashtra Rain Alert: विजांच्या कडकडाटासह पुढील 3 दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; यलो अलर्ट जारी
- Electric Bullet : अनेकांची वाढणार धाकधुक! दिवाळीत लॉन्च होणार इलेक्ट्रिक बुलेट; खासियत जाणुन व्हाल थक्क
- South China Sea : चीनची खुमखुमी वाढली! समुद्रातील ‘त्या’ प्रकाराने फिलीपीन्स भडकला; पहा, काय घडलं ?
- IND vs AUS : रविवारी दुसरा सामना; पहा, इंदोरमध्ये कुणाचंं पारडं जड ?
- Team India चा पराक्रम तरीही गंभीर नाराजच, म्हणाला विश्वचषकात जिंकायचं असेल तर…