दिल्ली – मोफत LPG गॅस टाकी (LPG) योजना सुरू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य आहे. या योजनेनुसार वर्षभरात तीन गॅस टाक्या मोफत देण्याची तरतूद आहे. इतकेच नाही तर इतरही अनेक गोष्टी राज्यात मोफत मिळणार आहेत. त्याचा मसुदा उत्तराखंडच्या (Uttarakhand) धामी सरकारने तयार केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Election) भाजपने (BJP) निवडणूक जाहीरनाम्यात मोफत गॅस टाकी देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच किफायतशीर दरात साखर (Sugar) उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही सरकार पूर्ण करण्याच्या तयारीत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने सत्तेत परतल्यावर गरीबांना दरवर्षी तीन सिलिंडर मोफत दिले जातील, असे आश्वासन दिले होते. राज्य सरकारकडून 1.84 लाख कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. राज्याच्या अन्नमंत्र्यांनी मंत्रालयाच्या सचिवांना यासंदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव (Proposal) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. अंत्योदय श्रेणीत येणाऱ्या लोकांना सरकार हा लाभ देणार आहे. अशा लोकांची यादी सरकारने आधीच तयार केली आहे. मात्र मोफत गॅस टाकी कधीपासून सुरू होणार, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. आता जो सण आधी येईल, त्यापासून मोफत गॅस सिलिंडर सुरू केले जातील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गरीब जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
इतकेच नाही तर लोकांना स्वस्त दरात साखर देण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. लाभार्थी कुटुंबांना कार्डवर अनुदानित स्वयंपाकाचे तेल देण्याचीही तयारी सुरू आहे. याशिवाय, सरकार गरजू लोकांना कमी दरात गहू आणि तांदूळ देखील देईल.
शेतकऱ्यांना मोफत वीज.. होळी दिवाळीला गॅस टाकी सुद्धा मोफत.. पहा, कुणी पाडलाय आश्वासनांचा पाऊस